आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॉली बॅगमध्ये बॉम्ब शोधत होते पोलिस, जे निघाले ते पाहून सर्वांना बसला धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर (झारखंड) - येथील टाटानगर रेल्वेस्टेशनसमोर पार्किंगच्या तिसऱ्या गेटवर शुक्रवारी रात्री उशिरा एक बेवारस ट्रॉली बॅग आढळल्याने खळबळ उडाली होती. बॅगमध्ये बॉम्ब मिळाल्याची माहिती कळताच पोलिस बॉम्बनाशक पथकासह पोहोचले. यानंतर ट्रॉली बॅग उघडताच त्यातून 5 फूट उंचीच्या एक तरुणीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी कोलकाताच्या एका डॉक्टरला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
 
ऑपरेशन मॅनेजरच्या पोस्टवर जॉब करायची तरुणी...
 - सूत्रांनुसार, पोलिसांना रात्री उशिरा स्टेशनवर बेवारस बॅग असल्याची माहिती मिळाली. बॉम्बच्या शक्यतेमुळे बॉम्ब नाशक पथकासह पोलिस पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. बॅग उघडताच त्यांना तरुणीचा मृतदेह आढळला. ट्रॉली बॅगमध्ये रुपये, पॅन कार्ड, आयडीबीआय बँकेचे पासबुक आणि आधार कार्डही आढळले. प्रेम-प्रकरणामुळे खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
 
कशी पटली ओळख?
- चौकशीनंतर पोलिसांनी मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. शनिवारी मृत तरुणी ही कदमा येथील चयनिका कुमारी असल्याचे कळले. चयनिका जमशेदपूरच्या मॅडिट्रिना रुग्णालयात ऑपरेशन मॅनेजरच्या पदावर काम करत होती.
- पोलिस सूत्रांनुसार, गळा दाबून तरुणीचा खून झाला. त्यानंतर मृतदेह बॅगमध्ये भरून येथे ठेवण्यात आला होता. सकाळी पोलिसांत पोहोचलेल्या कुटुंबीयांनी सांगितले, चयनिका आदल्या रात्रीपासून घरी आली नव्हती, तर हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे की, तिने 1 नोव्हेंबरपासून सुटी घेतलेली होती. दोन नोव्हेंबर रोजी चयनिकाच्या आजीचे निधन झाले होते.
 
खूप चांगली मुलगी होती चयनिका, धक्का बसला: हॉस्पिटलचे हेड
- हॉस्पिटलचे हेड अमिताभ कुमार म्हणाले की, चयनिका खूप चांगली मुलगी होती. ऑफिस संपल्यावर ती रोज घरी जायची. पण एका रात्री घरी गेली नाही.
- यानंतर तिच्या कुटुंबीयांचा फोन आला. मग सगळ्यांनी खूप शोधाशोध केली. शनिवारी सकाळी पोलिस स्टेशनमधून फोन आला आणि कळले की चयनिकाचा मृतदेह आढळला आहे. हे आमच्यासाठी खूप धक्कादायक होते. नंतर कळले की, कोलकात्याच्या एका डॉक्टरने तिचा खून केला आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...