आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सुंदर तरुणीने केले असे काम, एकदा तर पोलिसही गेले चक्रावून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंदर दिसणारी ही तरुणी असे काम करेल यावर सुरुवातीला कोणालाच विश्वास नव्हता. - Divya Marathi
सुंदर दिसणारी ही तरुणी असे काम करेल यावर सुरुवातीला कोणालाच विश्वास नव्हता.
मेरठ - नौचंडी परिसरात एका रेडिमेड गारमेंटच्या शोरूममध्ये चोरी करताना तरुणीला दुकानदारांनी रंगेहाथ पकडले. पकडल्यावर अगोदर युवतीने स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगून हंगामा क्रिएट केला. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर कुठे तिने नरमाईने घेतले. 
 
असे आहे प्रकरण
- मेरठच्या जागृती विहारमध्ये विशाल यांचे रेडीमेड गारमेंटचे शोरूम आहे. विशाल म्हणाले की, मागच्या 27 जुलैला एक तरुणी आमच्या शॉपवर कपडे खरेदी करायला आली होती. आम्ही तिला एकामागे एक कपडे दाखवत होतो आणि ती नजर चुकवून महागडे कपडे पार करत होती. 
- नंतर म्हणाली - मला यातले कोणतेही पसंत नाहीये. आणि ती शॉपमधून बाहेर गेली. ती गेल्यावर जेव्हा आम्ही कपडे गोळा केले तेव्हा कळले की ती कपडे चोरून पसार झालीये. 
- ती पकडली जावी म्हणून आम्ही दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील तिची फुटेज पोलिसांना दिली.
- गढ रोडवर माझ्या परिचिताचे गारमेंट शॉप आहे. बुधवारी त्यांनी ती या शॉपमध्ये असल्याचे मला फोनवर सांगितले. मी लगेच तिथे पोहोचलो. ते म्हणाले की, ती जवळच्या दुकानात गेली आहे. मी इतर व्यापाऱ्यांना सोबत घेतले आणि त्या शॉपमधूनही या बहाद्दर महिलेला दोन ब्रँडेड शर्टांची चोरी करताना रंगेहाथ पकडले. 
- पकडल्यावर भोळेपणाचा आव आणून म्हणू लागली की, मी असे काहीच केलेले नाही. मला का त्रास देत आहात? आम्ही पोलिसांना बोलावल्यावर कुठे ती नरम झाली.
 
रुरकीची राहणारी आहे तरुणी
- नौचंडीचे पोलिस स्टेशन इन्चार्ज अर्जुन सिंह म्हणाले, तरुणीने आपले नाव नेहा, राहणार रुडकी असे सांगितले आहे. तिच्या सांगितलेल्या पत्त्यावर तपास केला जात आहे. तरुणीने आणखी दोन शोरूममधूनही कपडे चोरल्याची तक्रार आली आहे. यासंबंधी तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून तपासानंतर तरुणीविरोधात कारवाई होईल.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...