आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्याकडून असे घडले ज्याला माफी नाही... लिहून 8 वीतील मुलीने घेतला गळफास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझियाबाद - उत्तर प्रदेशातील गाझियाबादची रहिवासी असलेल्या 8वीतील विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने सुसाइडनोटमध्ये लिहिले, 'आय लव्ह यू मम्मा... माझी पहिली चूक मी जन्माला येणे आणि दुसरी चूक प्रेम करणे आहे.'

वाचा, काय आहे पूर्ण प्रकरण
- गाझियाबादमधील साहिबाबाद येथील रीमा (नाव बदलले आहे) तिची 15 वर्षांची मुलगी आणि पती देवेश (नाव बदलले आहे) यांच्यासोबत भाड्याच्या घरात राहाते.
- रीमा एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नोकरी करते. तिची मुलगी 8 व्या वर्गात होती.
- बुधवारी सायंकाळी घरी कोणी नव्हते. याच दरम्यान रीमाच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
- रात्री रीमा घरी आली तेव्हा मुलगी गळफास घेऊन लटकलेली होती. ते पाहिताक्षणी तिने आरडाओरड सुरु केली.
- तिचा आवाज ऐकून शेजारी धावत आले.
शेजाऱ्यांनी दिली पोलिसांना माहिती
- शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
- घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंख्याला लटकलेला मृतदेह खाली उतरवला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
- पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइडनोट मिळाली.
- सुसाइडनोट वाचून आईला धक्काच बसला.
- पोलिस अधीक्षक अनूप सिंह म्हणाले, घटनेचा पंचनामा करण्यात आला असून चौकशी सुरु आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, असे काय होते सुसाइडनोटमध्ये...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...