आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियकराचा वाढदिवसासाठी हॉटेलमध्ये बुक केली रूम, नंतर प्रेयसीने केले असे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंबाला- येथे शनिवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्यासोबत एका हॉटेलमध्ये गेलेल्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रियकराने स्वप्ना देखील आपल्या वाढदिवशी असे काही घडेल याची कल्पणा केली नव्हती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रियकराला ताब्यात घेत विचारपूस केली, तसेच तरूणीच्या नातेवाइकांना देखील बोलवण्यात आले होते.

 

दोघांना करायाचे होते लग्न, घरच्यांचा होता नकार...
- लालाकुर्ती येथील हॉटेल सन स्टारचे मालक रोहन यांनी सागितले की, शनिवारी त्यांच्या हॉटेलमध्ये कुरूक्षेत्र येथील एक जोडपे वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते.
- दोघांनी आपले आयडीप्रूफ दाखवून हॉटेलमध्ये रूम बुक केली. अंदाजे दोन तासानंतर युवक रूममधून मदतीसाठी ओरडत बाहेर आला. खोलीत जाऊन पाहिले तेव्हा गळफास घेतलेल्या अवस्थेत युवती दिसली. त्यानंतर लगेच पोलिसांना माहिती दिली.
- पोलिस अधिकारी भूषण दास यांनी सांगितले की, युवक-युवती दोघेही कुरूक्षेत्र येथील राहणारे आहेत, चौकशीत युवकाने सांगितले की, त्याच्या घरचे दोघांच्या लग्नाच्या विरोधात होते, परंतु प्रेयसीने असे का केले हे त्याला समजलेच नाही.
- लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये काहीतरी वाद झाला असावा आणि त्यामुळे युवतीने गळफास घेतला असावा असा अंदाज पोलिसांना वर्तवला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...