आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Confined Raped For 40 Days Rescued At Rajastan

तब्बल 40 दिवस घरात डांबून ठेऊन सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचा युवतीवर बलात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- राजस्थानातील एका 18 वर्षीय युवतीला तब्बल 40 दिवस डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरने पीडितेला नोकरीचे आमिष दाखवून तिला घरात डांबून ठेवले आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
असे आहे प्रकरण...
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित युवती श्योपूर येथील रहिवासी आहे. आरोपी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर गिरिराज बैरवाकडे ती नोकरी मागण्यासाठी गेली होती. गिरिराज बैरवाने तिला आपली कन्स्ट्रक्शन साइट दाखवण्याच्या बहाण्याने स्वत:च्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नव्हे तर तिला ड्रग्ज देऊन 40 दिवस डांबून ठेऊन तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.
पीडितेने सोमवारी (6 जुलै) गिरिराजच्या तावडीतून कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. पब्लिक बुथवरून पोलिसांना फोन करून 'आपबिती' सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने दखल घेऊन पीडितेजवळ पोहोचले. मात्र, तोपर्यंत ती बेशुद्ध पडली होती. पोलिसांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. पीडितेवर उपचार सुरु असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.