आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगावर फाटलेली जीन्स आणि टॉप; ट्रॉली बॅगमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- सोमवार,7 नोव्हेंबर. रात्री जवळपास आठ वाजले होते. जयपूरमधील गांधीनगर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्म क्रमांक 1 वर रक्ताने माखलेली ट्रॉली बॅग पाहून प्रवाशांमध्ये एकच धावपळ उडते. घटनास्थळी पोलिस पोहोचतात. ते बॅक उघडून पाहातात तर काय, त्यात 20-22 वयोगटातील तरुणीचा मृतदेह असतो. तिच्या अंगावर जीन्स आणि टॉप असतो. जीन्सचे बटण मात्र तुटलेले असते. गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची निशाणी. चेहर्‍यावर रुमाल बांधलेला. हे कोणत्या सिनेमाचे कथानक नाही तर सत्य घटना आहे.

जयपूरमधील गांंधी नगर रेल्वे स्टेशनवर एक ट्रॉलीबॅग सापडली आहे. त्यात एक तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहे. तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हत्येेपूर्वी तरुणीवर बलात्कार?
- तरुणीची हत्या दुसर्‍या शहरात झाली असावी. नंतर तिचा मृतदेह ट्रॉलीत ठेऊन मारेकर्‍याने बॅग गांधीनगर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर सोडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
- सध्या तरुणीचा मृतदेह एसएमएस हॉस्पिटलच्या पीएम रुममध्ये ठेवण्यात आला आहे.
- तरुणीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाला असावा, असा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ट्रॉली बॅगेत सापडली सॅलरी स्लिप....
पोलिसांनी सांगितले की, ट्रॉली बॅगेत तरुणीच्या मृतदेहासोबत राकेश कुमार पांडेय नामक व्यक्तीची सॅलरी स्लिप सापडली आहे. एका खासगी कंपनीची जुलै 2013 ची ही सॅलरी लेरी स्लिप आहे.
- तसेच बॅगजवळ एक फाटलेले जनलरल तिकीट देखील सापडले आहे. ते बृजनगर ते जयपूरचे आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, घटनेेशी संबंधित फोटोज....
बातम्या आणखी आहेत...