आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्दयी पोलिसांमुळे पाच वर्षीय चिमुरडीचा उपचाराअभावी मृत्‍यू, वाचा असे काय झाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद- अलाहाबादमध्‍ये पोलिसांच्‍या निर्दयीपणामुळे एका पाच वर्षीय मुलीचा बळी गेला. भू-माफियांच्‍या सांगण्‍यावरुन जमीन विक्रीला विरोध करणा-या एका कुटुंबाला पोलिसांनी तुरूंगात डांबले. दरम्‍यान त्‍यांची आजारी मुलगीही सोबत होती. मुलीला उपचार करायचे आम्‍हाला सोडून द्या, अशी विनवणी करूनही पोलिसांच्‍या पाषाण काळजाला पाझर फुटला नाही. अखेर उपचाराअभावी मुलीचा मृत्‍यू झाला. तेव्‍हा पोलिसांनी या कुटुंबाला सोडून दिले.
मुलीच्‍या मृत्‍यूनंतर शूक्रवारी चांगलाच गोंधळ झाला. पीडित कुटुंबाचा आरोप आहे की, कोणतीही केस दाखल नसताना एका भू माफियाच्‍या दबावातून परिसरातील पोलिसांनी लहान मुलीच्‍या आई-वडिलांना घरून उचलून पोलिस ठाण्‍यात आणले. कोणतेही कारण नसताना त्‍यांना बसवून ठेवले. दरम्‍यान, त्‍यांची आजारी मुलगी उपचाराऐवजी तडफत होती; मुलीच्‍या उपचारासाठी आम्‍हाला सोडून द्या अशी मागणी मुलीचे आई-वडिल करत होते. मात्र, जेव्हा रात्री उशीरा मुलीचा मृत्‍यू झाला. तेव्‍हा या निर्दयी पोलिसांनी कुटुंबाला सोडले. मुलीचे आई-वडिल आणि शेजारच्‍यांनी शुक्रवारी सकाळी पोलिसांच्‍या विरोधात मोर्चा काढला व मुलीचा मृतदेह रस्‍त्यावर ठेऊन आंदोलन केले. काळीज पिळून काढणा-या या घटनेनंतरही प्रशासन शांत आहे.
जमिनीच्‍या वादामुळे घडली घटना..
- अलाहाबादमध्‍ये एका पाच वर्षीय मुलीचा उपचाराअभावी मृत्‍यू झाला.
- मुलीच्‍या मृत्‍यूला पोलिस जबाबदार असल्‍याचा आरोप आई-वडिलांनी केला आहे.
- शहरातील बेनीगंज भागातील सुधीर कुशवाहा हे भाड्याने बांबू आणि बल्‍ली वाहतूकीचा व्‍यवसाय करतात.
- सुधीर यांचा आरोप आहे की, आम्‍ही राहत होतो, ती जमीन बळकावण्‍यासाठी काही भू माफिया दबाव आणत होते.
- ही जमीन विकण्‍यासाठी भू माफिया आम्‍हाला दबाव आणत होते.
- सुधीर यांनी भू माफियांना विरोध केला असता भू माफियाने पोलिसांशी हात मिळवणी करून या कुटुंबाला जबरीने पोलिस ठाण्‍यात आणले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...