आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऱाखी पौर्णिमेच्या आधी सुटली बहिणीची साथ, मुलीचे कलेवर पाहून आईचा फुटला बांध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली (पंजाब) - राखी पौर्णिमेआधीच एका भावाला सोडून त्याची बहिण कायमची निघून गेली आहे. 9 वर्षांची मुस्कान या राखी पौर्णिमेला स्वतःच्या हाताने बनविलेली राखी भावाला बांधणार होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मोहालीमध्ये पावसामुळे ड्रेनेज लाइनमध्ये पाणी बरले आहे. अशाच एका उघड्या ड्रेनजमध्ये पडून मुस्कानचा मृत्यू झाला आहे. तिच्या निधनाची माहिती मिळाल्यानंर तिची आई मीनू मुलीचे कलेवर मांडीवर घेऊन कित्येक तास रडत होती.

कशी घडली घटना
- 9 वर्षांची मुस्कान सायंकाळी मुलांसोबत खेळत होती. तिचे आई-वडील कामावरुन आले नव्हते.
- शेतातून भाजी तोडल्यानंतर खड्ड्यात साचलेल्या पाण्यात हात धुण्यासाठी ती गेली आणि तिचा पाय घसरून त्यात पडली.
- शेजारी काम करत असलेल्या लोकांनी तीला बाहेर काढले मात्र तोपर्यंत त्या लहानगीची प्राणज्योत मालवली होती.
- मुलीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर मीनू धावतच आली. मुलीचे कलेवर मांडीवर घेऊन कित्येक तास ती रडत होती.
- राखी पौर्णिमेला माझी राणी स्वतः बनविलेली राखी भावाला बांधणार होती. त्याआधीच कुठे हरवून गेली. असे म्हणत मीनू रडत होती.

सुरक्षेशिवाय पाइपलाइन टाकणे मुलीच्या जीवावर बेतले
- मोहालीमध्ये रोड आणि सीव्हर लाइनचे काम सुरु आहे. त्यासाठी जमीन खोदून ठेवण्यात आली. ड्रेनेजचे खड्डे खोदण्यात आले.
- पावसामुळे त्यात पाणी साचले असून त्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, 9 वर्षांच्या मुस्कानच्या मृत्यूनंतर परिसरावर पसरली शोककळा..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...