आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैशांसाठी या थराला गेली ही महिला; वाचा, असे काय केले तिने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - इंदूर-पाटणा रेल्वे दुर्घटनेनंतर डोके सुन्न करणारे एक प्रकरण समोर आले आहे. एक महिला कानपूर सरकारी हॉस्पिटलच्या पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचली. तिचे म्हणणे होते, 'दुर्घटनेत माझ्या भावाचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह घेण्यासाठी मी आले आहे.' महिलेची चौकशी केल्यानंतर, पैशांसाठी लोक काय-काय करु शकतात याचा अजब नमुना पाहायला मिळाला. मृत व्यक्तीची बहिण असल्याचे सांगून ती मृताच्या नुकसानभरपाईची रक्कम लाटण्याचा प्रयत्न करीत होती. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे.
३६ तास पोस्टमॉर्टम हाऊसबाहेर उभी राहिली महिला, म्हणाली- भावाची डेडबॉडी द्या...
- उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये २० नोव्हेंबर रोजी झालेल्या रेल्वे अपघातात १५० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. शेकडो लोक जखमी झाले आहेत.
- दुर्घटनेनंतर आपल्या आप्तांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी अकबरपूर पोस्टमॉर्टम हाऊसबाहेर लोकांची गर्दी झाली आहे.
- २१ नोव्हेंबर रोजी येथे एक महिला आली, तिने स्वतःचे नाव प्रीति सांगितले.
- तिने सांगितले, की ती वाराणसीची रहिवासी आहे. २६ वर्षांचा रिशू माझा भाऊ होता. त्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे.
- लवकरात लवकर त्याचा मृतदेह माझ्या ताब्यात द्या.
- जवळपास ३६ तास ती पोस्टमॉर्टम हाऊस बाहेर उभी होती. तिच्याकडे रिशूचा आयडी प्रुफ मागितला तर तिने हात वर केले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आरोग्य मंत्र्यांच्या पायात पडली तोतया बहिण..
बातम्या आणखी आहेत...