आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही करत असाल रेल्वेतून प्रवास तर या गोष्टीकडे द्या लक्ष, तुमच्यासोबतही घडू शकते असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अन्नूच्या लहान बहिणीच्या डोळ्यादेखत ही घटना घडली. - Divya Marathi
अन्नूच्या लहान बहिणीच्या डोळ्यादेखत ही घटना घडली.
इंदूर- तुम्ही रेल्वेतून प्रवास करत असाल तर तुम्ही एका गोष्टीकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे. अनेक जण रेल्वेच्या दरवाजात उभे राहून मोबाईलवर बोलत असतात. अशाच एका घटनेत एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला. ही घटना मंदसौरपासून जवळ असणाऱ्या पिपल्यामंडी येथे घडली.

- इंदूर-उदयपूर रेल्वेने रतलाम येथील अन्नू आपले वडिल उंकारलाल डोडिया आणि लहान बहिणीसोबत रतनगड येथे चालली होती. प्रवासादरम्यान अन्नूला फोन आला. फोनवर बोलता-बोलता ती रेल्वेच्या दरवाजात गेली. फोनवर बोलता-बोलताच ती रेल्वेतून खाली पडली.
- अन्नूला खाली पडताना तिच्या लहान बहिणीने पाहिले. त्यानंतर तिने आरडाओरडा केला. त्यानंतर प्रवाशांनी चैन खेचून गाडी थांबवली. 
- गाडी थांबल्यावर प्रवाशांनी गार्ड आणि टीटीला सगळी बाब सांगितले. त्यानंतर गाडी रिव्हर्स घेण्यात आली. लोकांच्या दबावामुळे गार्डने लोको पायलटला ट्रेन रिव्हर्स घेण्यास सांगितले. ट्रेन परत घटनास्थळावर आणल्यानंतर अन्नूला ट्रेननेच पिपल्यामंडी स्टेशनवर आणण्यात आले.
- स्टेशनवरुन अन्नूला रुग्णवाहिकेतुन मंदसौर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला.
 
पुढील महिन्यात होते अन्नूचे लग्न
- अंजूने दिलेल्या माहितीनुसार अन्नूचा साखरपुडा झाला होता. पुढील महिन्यात तिचे लग्न होणार होते. तिथे बोलता-बोलता दरवाजापर्यंत गेली आणि अपघात घडला. तर प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानूसार अन्नूने इयर फोनवर गाणी ऐकत होती. डब्ब्यात गर्दी जास्त असल्याने ही घटना घडली.
 
रेल्वेतून प्रवास करताना या गोष्टींची घ्या काळजी
- प्रवास करताना शक्यतो दरवाजात उभे राहु नका.
- प्रवास करताना इयर फोनचा वापर करु नका.
- दरवाजात उभे राहून फोनचा वापर करणे टाळा
- अनोळखी व्यक्तीने दिलेल्या वस्तूंचा वापर टाळा
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...