आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड महिन्याच्या मुलीच्या अंगावर चढला साप, या तरुणीने दाखवली हिंमत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीड महिन्यांच्या दृष्टीसह तिची मावशी संतोष. - Divya Marathi
दीड महिन्यांच्या दृष्टीसह तिची मावशी संतोष.
उदयपूर (राजस्थान) - येथील यशवंतसिंह यांच्या घरात झोपलेल्या दीड महिन्याच्या मुलीसोबत असे काही घडले की सर्वांचीच पाचावर धारण बसली. मात्र त्या चिमुकलीसोबत झोपलेली तिची मावशी संतोषने हिंमत दाखवली आणि मुलीचा जीव वाचवला. झाले असे, की घरात झोपलेल्या मुलीच्या अंगावर विषारी साप चढला होता. हे दृष्य पाहून बाळाची आई आणि मावशी भयभीत झाली होती. तेवढ्यात मुलीने डोळे उघडले आणि त्या दोघींच्या काळाजाचा थरकाप उडाला.
आमचा थरकाप उडाला होता
> ही घटना शुक्रवार सकाळी आठ वाजता दरम्यानची आहे. मुलीची मावशी संतोषने सांगितले, मी आणि ताई तिची दीड महिन्याची मुलगी दृष्टीसोबत झोपलेले होते.
> अचानक माझे डोळे उघडले तेव्हा पाहाते तर लहानग्या दृष्टीच्या अंगावर एक साप फणा काढून बसला होता.
> जवळपास चार फुटांपेक्षाही तो लांब होता. त्याला पाहिल्यानंतर जणू माझा श्वास रोखला गेला होता. ते दृष्य पाहून ताई देखील सुन्न झाली होती.
> भीतीने आमचे शरीर थरथर कापत होते. तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता.
> ताईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. काय करावे मला तर काही सुचत नव्हते.
> तेवढ्यात दृष्टीनेही डोळे उघडले. ती टकमक त्या सापाकडे पाहू लागली. आता तर आमची गाळण उडाली होती.
दृष्टीने त्याला हात लावला असता तर...
> जर लहानग्या दृष्टीने जराही हालचाल केली किंवा त्या सापाला पकडण्याचा प्रयत्न केला तर...
> हा विचार मनात आला आणि मी झटकन त्याला पकडले आणि पलंगाखाली फेकून दिले.
> ताईने दृष्टीला उचलून घेतले आणि आम्ही दोघींनीही ओरडतच तेथून पळ काढला.
> तो क्षण आठवला तर आजही घामफुटतो, असे संतोषने सांगितले.
> ती म्हणाली मी लहानसहान किड्यांनाही घाबरते. मात्र त्या दिवशी माझ्यात तेवढी हिंमत कशी आली हे ठाऊक नाही.

रेस्क्यू टीम पोहोचली
> दोन्ही महिला आरडोओरड करत घरातून बाहेर पळत आल्यानंतर शेजारी जमले.
> लोकांनी तत्काळ वाइल्ड अॅनिमल रेस्क्यू टीमला कॉल केला.
> टीमने मोठ्या कष्टाने त्या सापाला पकडले आणि जंगलात सोडून दिले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसे पकडले सापाला...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...