आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Girl Forced To Proselytism And Molest By Neighbour Latest National News And Updates

हिंदू तरुणीवर धर्मपरिवर्तनाचा दबाव, नकार दिल्याने केला बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित तरुणी. - Divya Marathi
पीडित तरुणी.
अलाहाबाद -  येथून 57 किमी अंतरावरील कौशांबीमध्ये एका हिंदू तरुणीवर धर्म परिवर्तनाचे प्रकरण समोर आले आहे. पीडित तरुणीचा आरोप आहे की, तिच्यावर बळजबरी धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकण्यात येत आहे आणि तिने असे करण्यास नकार दिल्यामुळे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यानंतर पीडित तरुणी न्यायासाठी कौशांबी पोलिसांत खेटे घालत आहे, परंतु तिला न्याय मिळत नाहीये.
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- ही घटना डेप्युटी सीएमच्या जिल्ह्यातील कौशांबीच्या कोखराजमध्ये घडली. येथे राहणाऱ्या तरुणीने शेजारी राहणाऱ्या रईस नावाच्या तरुणावर गंभीर आरोप केले आहेत.
- तरुणीचा आरोप आहे की, "शेजारी राहणारा रईस मागच्या अनेक वर्षांपासून धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकत होता. पण त्याच्या या प्रयत्नांना मी भीक न घातल्याने त्याने माझ्यावर बलात्कार केला."
- "पोलिस अधिकारी मला न्याय देण्याऐवजी पोलिस स्टेशनच्या चकरा मारायला लावत आहेत. सोमवारी जेव्हा एसपी ऑफिसात माझी तक्रार घेऊन गेले तेव्हा तेथे बसलेल्या एका अधिकाऱ्याने माझा तक्रारअर्ज वाचला. यानंतर मला आणि आरोपी रईसला 5-5 चपला मारून जेलमध्ये टाका म्हणाला."
- पीडितेने म्हटले, जर मला न्याय मिळाला नाही, तर मी माझा जीव देईन. परंतु कोणत्याही परिस्थिती धर्म बदलणार नाही.
 
मुस्लिमबहुल परिसरात आहे पीडितेचे घर...
- पीडित तरुणीच्या वडिलांचे तिच्या लहानपणीच निधन झाले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर तिची आई तिला घेऊन माहेरी आली होती.
- यानंतर ती येथेच लहानाची मोठी झाली, बीएपर्यंत शिकली. मग घरखर्च भागवण्यासाठी घरातच एक जनरल स्टोअरचे दुकान उघडले.
- ज्या परिसरात ती राहते, तो मुस्लिमबहुल परिसर आहे. केवळ पीडितेचे घरच एकमात्र हिंदू कुटुंब तेथे आहे. यामुळे अनेक वेळा पीडिता आणि तिच्यावर आईला घर सोडून जाण्यासाठी दबाव टाकण्यात आलेला आहे.
 
काय म्हणतात पोलिस?
- एसपी प्रदीप गुप्ता म्हणाले, पीडिता आणि शेजारच्या महिलांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर बलात्काराचे आरोप केले आहेत. तपास सुरू आहे. पीडितेच्या तक्रारीवरून धर्मपरिवर्तनाची तक्रार नोंदवण्यात आली आहे. सध्या, पीडितेच्या तक्रारअर्जाला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...