आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमृतसरमध्‍ये तरुणीवर धावत्‍या कारमध्‍ये बलात्‍कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून अमृतसरमध्ये एका तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार सोमवारी रात्री घडला. एका २० वर्षीय तरूणीला कारमध्‍ये बळजबरीने ओढून चार जणांनी आळीपाळीने बलात्‍कार केला आणि सुमारे चार तासानंतर तिला रस्‍त्‍यावर फेकून दिले. पीडित तरुणीने यासंदर्भात तक्रार दाखल केली असून आरोपींचा शोध सुरु आहे.

पोलिस अधीक्षक हरजीत सिंग ब्रार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी एका मोबाईल कंपनीमध्‍ये काम करते. सोमवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कामावरुन घरी जाताना तरूणी बस स्टँडवर उभी होती. त्‍याचवेळी तेथे एक कार आली व काही तरूणांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये खेचले. चौघांनी कारमधील चार तरूणांनी मोठमोठ्या आवाजात गाणी लावली व तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तब्बल चार तास त्‍यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातून फिरवत तिच्‍यावर बलात्‍कार केला. त्यानंतर त्या नराधमांनी पीडित तरूणीला शहरातील कॅन्टोन्मेंट भागात फेकले. त्यानंतर उपचारांसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चार आरोपींपैकी दोघांची ओळख पटली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.