आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुजफ्फरनगरमध्‍ये शरणार्थी शिबिरात तरुणीवर सामुहिक बलात्‍कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फरनगर- उत्तर प्रदेशच्‍या मुजफ्फरनगर जिल्‍ह्यातील शरणार्थी शिबिरात एका मुलीवर सामुहिक बलात्‍कार केल्‍याची घटना उघडकीस आली आहे. दोन तरुणांनी जोग्‍या खेरी गावातील शिबिरात एका मुलीला जवळच्‍या शेतात ओढत नेले आणि तिच्‍यावर बलात्‍कार केला. पीडित मुलीने कुटुंबियांना याबाबत सांगितल्‍यानंतर तक्रार दाखल करण्‍यात आली. पोलिसांनी दोन्‍ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेनंतर जिल्‍ह्यात पुन्‍हा तणाव वाढला आहे. दरम्‍यान, मुजफ्फरनगरमध्‍ये तीन मोटारसायकलस्‍वारांवर गोळीबार करण्‍यात आल्‍याची माहिती आहे. त्‍यात एकाचा मृत्‍यू झाला असून दोघांना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. तिघेही रुडकी रोडवरुन जात होते. त्‍याचवेळी एका कारमधून त्‍यांच्‍यावर गोळीबार करण्‍यात आला. आधी कारने मोटारसायकलला धडक दिली. त्‍यानंतर त्‍यांच्‍यावर गोळ्या झाडण्‍यात आल्‍या.

शिबिरातील बलात्‍काराच्‍या घटनेमुळे पुन्‍हा तणाव वाढला आहे. बलात्‍काराची घटना सायंकाळी घडली. पीडित मुलगी शनिवारी शेताजवळ गेली होती. त्‍याचवेळी दोघांनी तिला शेतात ओढत नेले. बलात्‍कार केल्‍यानंतर त्‍यांनी तिला धमकी दिली आणि पळून गेले. तिने शिबिरात पोहोचल्‍यानतर कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला.

मुजफ्फरनगर जिल्‍ह्यातील दंगलींमध्‍ये 60 जणांचा मृत्‍यू झाला होता. त्‍यानंतर हजारो नागरिक शरणार्थी शिबिरात वास्‍तव्‍यास आहेत.