आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरणाच्या 5 दिवसांनंतर मरणासन्न अवस्थेत सापडली तरुणी, वाचा काय म्हणाली...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - येथील एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सलग 5 दिवस सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. नराधमांनी पाश्वी कृत्य करून पीडितेचे हातपाय बांधले आणि एका कालव्यात फेकून दिले. एवढे अत्याचार सहन करूनही ती धाडसी तरुणी जीवंत आहे. तिनेच हा प्रकार पोलिसांसमक्ष मांडून त्या नराधमांना कठोर शिक्षेची मागणी केली. 
 

काय आहे प्रकरण?
- येथील कागारौल परिसरातून एक तरुणी 19 ऑगस्टपासून बेपत्ता झाली. यानंतर संबंधित मुलीच्या आईने पोलिसांत याबाबतची तक्रार नोंदवली. 
- गेल्या 5 दिवसांपासून तरुणीचे कुटुंबीय तिचा शोध घेत भटकत होते. अखेर गुरुवारी संध्याकाळी खेरागड रोडलगत एका कालव्याच्या किनाऱ्यावर तरुणी बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिचे हातपाय बांधलेले होते. 
- रस्त्यावरून जाणाऱ्यांनी ते पाहून लगेच पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना ती 19 ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेली मुलगी असल्याचे समजले.
 

नराधमांची आई हसत होती...
- तिची ही अवस्था पाहून घरच्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी वेळीच तिला उपचारासाठी रुगणालयात दाखल केले. रात्रभर उपचार झाल्यानंतर अखेर दुसऱ्या दिवशी ती शुद्धीवर आली. 
- पीडित तरुणीने आईला सांगितल्याप्रमाणे, ती शनिवारी आपल्या मावशीकडे जात होती. त्याचवेळी कॉलनीत राहणाऱ्या दोन भावंडे गगन आणि पारस यांनी तिचे तोंड दाबून फरपटत नेले. या दोघांनी तिला एका घरामध्ये कोंडले होते. विशेष म्हणजे, पीडितेच्या घरापासून 3 घर दूर एका घरात तिला कोंडण्यात आले होते. 
- विशेष म्हणजे, या घरात आरोपींची आई सुद्धा होती. पीडितेने ओरडून तिला मदतीच्या याचना केल्या. मात्र, ती मदत करणे किंवा आपल्या मुलांना रोखणे सोडून ती हसून निघून गेली. 
- तिने सांगितल्याप्रमाणे, "यानंतर त्यांनी माझे हात-पाय बांधून तोंडात कपड्याचा बोळा घातला. तसेच गुंगीचे औषध देण्यात आले. जेव्हा-जेव्हा मी शुद्धीवर आले, तेव्हा-तेव्हा ते लोक मला गुंगीचे औषध देत होते."
- "शेवटच्या वेळी जेव्हा मी शुद्धीवर आले. तेव्हा मी एका कालव्याच्या किनाऱ्यावर होते. ये-जा करणाऱ्या लोकांनी गर्दी केली होती. त्यापैकीच काहींनी मला उचलून रुगणालयात आणले. 
- पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले. तसेच मुलीच्या मुलीची तक्रार नोंदवल्यानंतर आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.
 
बातम्या आणखी आहेत...