आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी करायला आले गुंड, उचलून नेले तरुणीला; तिने सांगितले वाटेत काय-काय झाले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जौनपूर - येथे शुक्रवारी रात्री उशिरा चोरीचा प्रयत्न निष्फळ ठरल्यावर 3 गुंडांनी घरातील तरुणीला उचलून कारमधून पळवून नेले. तिला 3 किलोमीटर अंतरावरील कालव्याजवळ उतरवले. बराच वेळाने घरी पोहोचलेल्या तरुणीने कुटुंबीयांना आपबीती सांगितली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.

आजीला दिला धक्का, मला उचलून कारमध्ये नेले...
- ही घटना जौनपूरच्या सरपतहा परिसरातील आहे. पीडितेने सांगितले, शुक्रवारीच मी आजीच्या घरी आले होते. त्या रात्री आम्ही दोघी व्हरंड्यात झोपलो होतो.
- चोरांचा आवाज ऐकून आजीला जाग आली आणि ती मदतीसाठी ओरडू लागली. यामुळे माझाही डोळा उघडला. तेवढ्यात गुंडांनी आजीला धक्का देऊन खाली पाडले.
- मी ओरडू लागले तेव्हा एकाने माझे तोंड दाबले, तर बाकीच्या दोघांनी माझे पाय पकडून मला कारमध्ये टाकले.
 
रस्त्यात गुंडांनी केले असे...
- रस्त्यात गुंड आपसात बोलत होते. मुलीला कोणीही धक्का लावू नका. चोरी झाली नाही, जाऊ द्या! तिला इथेच पुढे उतरून द्या. गावातले लोक मागे लागलेत. 
- एक गुंड म्हणाला, जे करायचे ते करून घ्या, हिनेच चोरी करू दिली नाही.
- तरुणीच्या वडिलांनी सांगितले, मला दोन मुले आहेत. गावात असा प्रकार कधीही घडला नाही. दोन्ही मुले घराच्या व्हरंड्यात झोपली होती. रात्रीच्या वेळी चोरांनी चोरीचा प्रयत्न केला. माझ्या मुलीचे कोणतेही नुकसान झालेले नाही.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...