आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्चनावर माझे प्रेम होते, पण ती दुसऱ्याशी बोलू लागली होती... म्हणून जीव घेतला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत अर्चना. एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तिचा खून केला. - Divya Marathi
मृत अर्चना. एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तिचा खून केला.

गाझीपूर (यूपी) - शुक्रवारी एका तरुणाने एकतर्फी प्रेमात तरुणीची हत्या केली. यानंतर स्वत: पोलिसांत हजर होऊन सरेंडरही केले. आरोपी म्हणाला, "माझे तिच्यावर प्रेम होते, ती दुसऱ्या मुलाशी बोलू लागली होती, म्हणूनच जीव घेतला."

 

असे आहे प्रकरण...
- गाझीपूरच्या दिलदारनगर मध्ये ही घटना घडली. अर्चना (16) आणि रंजित दोघेही एकाच गावातील रहिवासी आहेत.
- पोलिस इन्स्पेक्टर अखिलेश त्रिपाठी म्हणाले, मृत अर्चना 11वीची विद्यार्थिनी होती. शाळेतून सुटी घेतल्यानंतर ती छोटी बहीण नेहा आणि गावातल्या दोन मैत्रिणींसह घरी परतत होती.
- घात लावून बसलेला रंजित वाटेतून बळजबरी तिला फरपटत जवळच्याच पडक्या घरात घेऊन गेला आणि चाकूने तिच्यावर असंख्य वार केले. मुलींनी आरडाओरड केल्यावर आसपासचे लोक पळतच आले, परंतु तोपर्यंत अर्चनाचा मृत्यू झाला होता.
- खून केल्यानंतर रंजित चाकू फेकून थेट पोलिस स्टेशनमध्ये गेला आणि सरेंडर केले.
- अर्चनाचे वडील अनिल कुमार म्हणाले- रंजितने अर्चनाची अनेक वेळा छेडछाड केली होती. रंजित तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. पण काही दिवसांपूर्वी तो बंगळुरूला कामासाठी गेला होता. 3-4 दिवसांपूर्वीच तो गावी परतला होता.

 

आरोपी म्हणाला- ती दुसऱ्याशी बोलू लागली होती..
- एसपी सोमेन वर्मा म्हणाले- अटकेतील आरोपी तरुण म्हणाला- तो तिच्यावर प्रेम करत होता, पण दुसऱ्या मुलाशी ती बोलू लागली होती. यामुळे नाराज झाला आणि चिडून त्याने मुलीचा चाकूने भोसकून खून केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून निश्चितच कडक कारवाई होईल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...