आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ती कॉलेजमधून बाहेर पडताच, हल्‍लेखोराने कोयत्‍याने कापली मान, हातही छाटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामगड (झारखंड) - येथील परमहंस बी.एड. कॉलेजच्या एका विद्यार्थिनीचा गळा आणि हात कापून हत्‍या करण्‍यात आल्‍याची धक्‍कादायक घटना घडली आहे. हत्‍या-याने कोयत्‍याने या युवतीचा गळा कापला आहे. त्‍यानंतर त्‍याने हत्‍यार घटनास्‍थळी फेकून दिले व तो फरार झाला. सोनाली मुर्मू असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती बोकारो जिल्‍ह्यातील महुआटांड येथील रहिवाशी आहे.
- मृत विद्यार्थिनी विवाहीत होती तिला एक अपत्‍यही होते.
- कॉलेजमध्‍ये सध्‍या तिची परीक्षा सुरू होती.
- तिचे पती दररोज तिला सोडण्‍यासाठी कॉलेजमध्‍ये येत होते.
- बुधवारी ती एकटीच कॉलेजात आली होती.
काय आहे प्रकरण..
- रामगड पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ही हत्‍या प्रेम प्रकरणातून झाली.
- पोलिसांच्‍या मतानुसार हत्‍या करणारा तिचा आधीचा बॉयफ्रेंड असावा.
- घटनास्थळावर सोनालीचे ओळखपत्र पोलिसांना मिळाले.
- यावरून तिची जन्‍मतारीख 08.08.1985 असल्‍याचे लक्षात येते.
- ओळखपत्रावर तिच्‍या वडिलांचे नाव जीतन मुर्मू आणि आईचे वेरोनिका हसदक आहे.
जेवणाच्‍या सुटीत निघाली होती बाहेर..
- सोनाली सकाळी वाजता जेवण्‍यासाठी कॉलेजच्‍या बाहेर पडली होती.
- दरम्‍यान गेटवर अज्ञात व्‍यक्‍तीने तिच्‍या गळ्यावर धारदार शस्‍त्राने वार केले.
- हल्‍ल्यात तिचा हातही तोडण्‍यात आला.
- विद्यार्थिनीने आरडा-ओरड करताच परिसरातील मजूर घटनास्‍थळावर आले.
- तोपर्यंत सोनालीने प्राण सोडले होते.
- बुधवारी सकाळी 11.30 वाजता ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्‍थळावरून शस्‍त्र ताब्‍यात घेतले आहे.
- या विद्यार्थिनीला कुणीतरी फोन करून बाहेर बोलावल्‍याचा संशय पोलिसांना आहे.
- सोनालीच्‍या मोबाइलमधील कॉन्‍टॅक्‍ट नंबर पोलिस तपासत आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...