आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह्य फोटो पोस्ट झाल्याने दिला जीव, म्हटले- आई-वडीलांनीही अविश्वास दाखवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आक्षेपार्ह्य फोटो फेसबुकवरुन हटवण्याची विनंती तिने पोलिसांना केली होती. - Divya Marathi
आक्षेपार्ह्य फोटो फेसबुकवरुन हटवण्याची विनंती तिने पोलिसांना केली होती.
चेन्नई - फोटोशॉप्डने तयार केलेले न्यूड फोटो फेसबुकवर पोस्ट करणाऱ्यावर कोणतीही कारवाई होत नाही, यामुळे निराश झालल्या तरुणीने आत्महत्या केली आहे. तामिळनाडूमधील सालेम जिल्ह्यातील 21 वर्षांच्या विनुप्रियाचे फेसबुकवर आक्षेपार्हय फोटो पोस्ट करण्यात आले होते. विनुप्रियाने याची पोलिसात तक्रार देऊन 15 दिवस झाल्यानंतरही आरोपींवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. दुसरीकडे पीडितेचे म्हणणे होते, की कुटुंबीयांनी देखील तिच्यावर अविश्वास दाखवला होता.

- पीडित तरुणीने तिच्या फोटोसोबत झालेल्या छेडछाडीची पोलिसात तक्रार दिली होती.
- आक्षेपार्ह्य फोटो फेसबुकवरुन हटवण्याची विनंती तिने पोलिसांना केली होती.
- मात्र घटनेच्या 15 दिवसांनंतरही फोटोशॉप्ड केलेला फोटो सोशल साइटवरुन हटवण्यात आला नाही.

सुसाइड नोटमध्ये काय लिहिले
- 21 वर्षांच्या विनुप्रियाने सुसाइडच्या आधी एक पत्र लिहून ठेवले होते.
- त्यात तिने आरोपींवर कारवाई होत नसल्यामुळे निराश असल्याचे म्हटले.
- त्यासोबतच या घटनेनंतर कुटुंबाने पाठबळ देण्याएवजी त्यांनीही अविश्वास दाखवून पाठ फिरवल्याचे नोटमध्ये म्हटले आहे.

पोलिस काय म्हणाले
- पोलिस म्हणाले, की या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली होती.
- आम्ही फेसबुक पेज ब्लॉक केले आहे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
- फेसबुवर तरुणीचे आक्षेपार्ह्य फोटो पोस्ट करणाऱ्याची माहिती गोळा केली जात आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...