आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Marriage Age Will Be 21 Year Madras High Court

मुलींचे लग्नाचे वय २१ वर्षे करावे, मद्रास उच्च न्यायालयाचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मदुराई - मुलींसाठी लग्नाच्या वयाची अट १८ वरून २१ वर्षे करायला हवी. १८ व्या वर्षी मुली गाडी चालवणे व नोकरी करण्यास फिट असू शकतात. पण लग्नासाठी परिपक्व ठरत नाहीत, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
मुलांसाठी हे वय २१ वर्षे आहे. १७ वर्षांपर्यंत मुले-मुली शाळेत सोबतच मोठे होतात. मग मुलींना १८ व्या वर्षीच परिपक्व कसे मानायचे, असा सवाल करत कोर्टाने कायद्यांत दुरुस्तीची सूचनाही केली.