आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन मुनीने सीमेन सँपलच्या जागी दिले असे काही, साडेसहा तास सुरू होती मेडिकल टेस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत - मुलीवर रेप केल्याच्या आरोपात चर्चेत आलेला जैन मुनी जेव्हा मेडिकल चेकअपसाठी शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचला होता, तेव्हा त्याचे केस, नखे, लाळ आणि ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते. परंतु सीमेन सॅम्पलसाठी जेव्हा त्याला सांगण्यात आले तेव्हा त्याने सीमेनऐवजी ट्यूबमध्ये थुंकी टाकून दिली. डॉक्टरांनी सॅम्पल पाहून थुंकी असल्याची शंका व्यक्त केली होती.
 
साडेसहा तास चालले मुनीची मेडिकल टेस्ट...
- जैन मुनीकडून सीमेन सॅम्पल घेण्याचा 4 वेळा प्रयत्न करण्यात आला होता. जैन मुनीने डॉक्टरांसमोर स्वीकारले होते की, त्याने तरुणीच्या सहमतीने तिच्याशी लैंगिक संबंध बनवले होते.
- याचे स्टेटमेंट हॉस्पिटल रेकॉर्डमध्ये आहे. सीमेन सॅम्पल न मिळाल्याने मुनीला सोमवारी पुन्हा हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आले होते. परंतु ज्या डॉक्टरच्या ड्यूटीदरम्यान सॅम्पल घेण्यात आले आणि मेडिकल चेकअप करण्यात आले होते, ते त्या दिवशी नव्हते. त्या डॉक्टरांची ड्यूटी बुधवारी होती, म्हणून आरोपी जैन मुनीला बुधवारी पुन्हा बोलावण्यात आले.
 
युरोलॉजिस्टशिवाय साडेसहा तास चालली मुनीची मेडिकल टेस्ट
- नानपुरा दिगंबर जैन मंदिराचे आचार्य शांतिसागर यांच्यावर वडोदराच्या एका तरुणीकडून रेपचा आरोप लावण्यात आल्यानंतर आरोपी मुनीला पोटेंसी, सीमेन आणि डीएनए टेस्टसाठी बुधवारी सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले.
- तेथे पोलिसांच्या पहाऱ्यात तब्बल साडेसहा तास मेडिकल चेकअप करण्यात आले. यानंतर मुनीला परत तुरुंगात पाठवण्यात आले.
- याआधी पीडितेची मंगळवारी डीएनए टेस्ट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती. तथापि, ही टेस्ट युरोलॉजिस्टशिवाय फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे हेड डॉ. ए. गोवेकर यांच्या उपस्थितीत झाली.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...