आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाडीच्या भीतीने 3 महिने घरातच राहिली 12वीची विद्यार्थिनी, हिंमत करून गेली तेव्हा झाला खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
12वीची स्टुडंट रागिणीचा गावच्या सरपंचाच्या मुलाने भररस्त्यात खून केला. - Divya Marathi
12वीची स्टुडंट रागिणीचा गावच्या सरपंचाच्या मुलाने भररस्त्यात खून केला.
बलिया - यूपीच्या बलियामध्ये मंगळवारी एका मुलीचा भररस्त्यात खून झाला. मृत मुलगी 12वीची विद्यार्थिनी होती. घटनेच्या वेळी ती आपल्या बहिणीसह शाळेत जात होती. गावाच्याच सरपंचाच्या मुलाने आपल्या साथीदारांसह हा खून केल्याचा मुलीच्या नातेवाइकांचा आरोप आहे. पोलिसांनी खुनातील मुख्य आरोपी प्रिन्स तिवारी आणि राजू यादव यांना संध्याकाळी उशिरा गोरखपूरहून अटक केली.
 
खूप दिवसांपासून करत होते छेडछाड
 - बांसडीह परिसरातील रहिवासी रागिणी (17) याच वर्षी 11वी पास करून इंटरमध्ये आली होती. शाळेतून जाता-येता सरपंचाचा मुलगा इतर मुलांसह तिच्यावर अश्लील कमेंट करायचा. तिला पाहून शिट्या वाजवायचे, तर कधी फिल्मी गाणे म्हणायचे.
 - नेहमी नेहमी हा प्रकार होऊ लागल्याने मुलीने कंटाळून शाळेत जाणेच बंद केले होते. ती शिकण्यासाठी शेजारच्या गावात जायची.
 - मुलीची आई फुलमती यांनी सांगितले की, सरपंचाचा मुलगा सोमवारी आमच्या घरी आला होता. तो धमकी देत होता की, रागिणी शाळेत गेली तर तो तिच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. माझी मुलगी तब्बल 3 महिन्यांनंतर मंगळवारी शालेय परीक्षेची माहिती घेण्याकरिता शाळेत जात होती. सरपंचाच्या मुलाने दिलेल्या धमकीनुसार माझ्या मुलीचा खून केलाय. आता मलाही तो जिवंत असावा असे वाटत नाही. मलाही या खुनाचा बदला पाहिजे.
 
चाकूने भोसकून केली हत्या
 - रागिणी मंगळवारी सकाळी 8 वाजता शाळेत जाण्यासाठी आपल्या छोट्या बहिणीसह निघाली होती. बाइकवरून आलेल्या सरपंचाच्या मुलाने तिचा रस्ता अडवला आणि तिला धक्का मारून खाली पाडले.
 - एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही. त्याने खिशातून चाकू काढला आणि रागिणीच्या गळ्यावर वार केला. नंतर तिच्यावर शरीरावर चाकूने जागोजागी भोसकून आपल्या साथीदारांसह फरार झाला.
 
पोलिस काय म्हणतात?
 - एडीजी एलओ आनंद कुमार म्हणतात, तीन महिन्यांआधी हे कुटुंब छेडछाडीच्या तक्रारीसाठी पोलिस स्टेशनमध्ये आले होते. परंतु तेव्हा दोन्ही पक्षांना समजूत घालण्यात आली होती. आम्ही गावच्या सरपंचासह इतर 5 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 2 आरोपींना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...