आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केरळमध्‍ये 90 वर्षांच्या आईला मुलीने गोठयात डांबले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्लम / कोची - केरळच्या कोलम जिल्ह्यातील कुलाथूपुझा येथील एका मुलीने 90 वर्षांच्या आईला घराशेजारील शेळीच्या कुडात ठेवल्याची घटना समोर आली आहे. 90 वर्षीय रोझली आजारी असून बिछान्याशी खेळून आहे. त्या गेल्या काही वर्षांपासून लेक-जावयाकडे राहतात.


मुलाने आईकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिला मुलीकडे राहणे भाग पडले आहे. या प्रकरणी कुठलाही गुन्हा नोंद करण्यात आला नाही. रोझली यांची दुर्दशा शेजा-यांनी पाहिल्यानंतर स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये त्यावर चर्चा सुरू झाली. स्वयंसेवी संस्थेने त्यांना कोट्टारकारा येथील वृद्धाश्रमामध्ये दाखल केले आहे. दरम्यान, आठवडाभरापूर्वी बंगळुरू रेल्वेस्थानकावरून बेपत्ता झालेली 62 वर्षीय महिला पती व दोन मुलांसह कोची येथील केंद्रात आढळून आली. पती रेल्वेस्थानकावर पाण्याची बाटली घेण्यासाठी उतरला होता. परत आल्यानंतर पत्नी बेपत्ता झाल्याचे त्यांना दिसून आले. संबंधित महिला रस्त्यावरून फिरताना आढळल्यानंतर तिला 21 रोजी पल्लुर्थी मदत केंद्रात दाखल करण्यात आले होते. महिलेला सोमवारी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून आजाराशी सामना करणा-या सदर महिलेला स्वयंसेवी संस्थेकडून दिलासा मिळाला आहे.