आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीजेच्या तालावर ती करत होती बेधुंद होऊन डान्स, त्यानंतर घडले असे काही ती पोहचली ICU मध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीजेच्या तालावर 12 वर्षाची मुलगी डान्स करत होती. अचानक तिचे केस जनरेटरमध्ये अडकले आणि अपघात घडला. - Divya Marathi
डीजेच्या तालावर 12 वर्षाची मुलगी डान्स करत होती. अचानक तिचे केस जनरेटरमध्ये अडकले आणि अपघात घडला.
अलाहाबाद- उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे एक 12 वर्षाची मुलगी डीजेच्या तालावर नृत्य करत होती. डान्स करता-करता अचानक तिचे केस जनरेटरमध्ये फसले. त्यामुळे तिच्या डोक्यावरील केसासमवेत कातडेही निघाले. त्यानंतर मुलीला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
 
गया धाम यात्रेसाठी करण्यात येत होते ज्येष्ठ नागरिकांना रवाना
- घटना अलाहाबाद येथील मेजा पोलिस ठाण्याच्या ह्दद्दीत घडली. येथील काही ज्येष्ठ नागरिक गया धाम यात्रेला चालले होते. गावकऱ्यांनी त्यांना रवाना करण्यापूर्वी गाणी लावली होती.
- सकाळी 10 वाजता त्यांना रवाना करण्यापूर्वी लहान मुले डान्स करत होती. त्याचवेळी हेमा यादव ही 12 वर्षाची मुलगी जनरेटरजवळ पोहचली. तिथे तिचे केस जनरेटरच्या सेफ्टिनमध्ये अडकले. या घटनेत तिच्या कपाळावरील त्वचा पूर्णपणे निघाली.
ती पूर्णपणे रक्तबंबाळ झाली. वेदनेने तिने ओरडणे आणि विव्हळणे सुरु केले. मुलीची आई धावत आली आणि तिने आपल्या मुलीला उचलून घेतले. 
 
नीरज मिश्रा हा व्यापारी बनला देवदूत, तातडीने केले रुग्णालयात दाखल
- ही घटना घडली त्यावेळी व्यापारी नीरज मिश्रा तेथून चालले होते. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कार थांबवली आणि मुलीला एका हॉस्पीटलमध्ये दाखल केले.
- हे हॉस्पीटल 35 किलोमीटर अंतरावर असल्याने ते सातत्याने फोनवर डॉक्टर आणि सर्जन आर. पी. पांडे यांच्याशी संपर्कात होते. 

4 तास चालले ऑपरेशन
- डॉक्टर आणि सर्जन आर. पी. पांडे यांनी रुग्णालयात पोहचताच मुलीवर लगेच उपचार सुरु केले. तिच्यावर जवळपास 4 तास उपचार सुरु होते. सध्या या मुलीला अतिदक्षता विभागातच ठेवण्यात आले आहे.
- डॉ. आर. पी. पांडे म्हणाले, मुलीला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला आहे. तिला 72 तास निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर तिने लावलेल्या त्वचेला किती स्वीकारले आहे हे समजेल. तातडीने आणल्याने पेशी नष्ट झाल्या नव्हत्या.
- योग्य निदान झाले नसल्यास पुन्हा ऑपरेशन करावे लागू शकते. मुलीची तब्येत सध्या चांगली आहे. या मुलीच्या आईने आपली मुलगी केवळ नीरज मिश्रांमुळे वाचल्याचे सांगितले. त्यांनी तिला वेळेवर रुग्णालयात पोहचवले नसते तर ती वाचू शकली नसती असे मत त्यांनी व्यक्त केली. 
 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...