आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी सुंदर नाही, लग्नात घरच्यांचा खूप खर्च होईल; हे लिहून तरुणीने केली आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपराजिताने लग्नात कुटुुंबाचा पैसा खर्च होईल म्हणून आत्महत्या केली. - Divya Marathi
अपराजिताने लग्नात कुटुुंबाचा पैसा खर्च होईल म्हणून आत्महत्या केली.

रांची (झारखंड)- येथील लालपूर परिसरात एका गर्ल्स होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तिचा मृतदेह खोलीत फासावर लटकलेला आढळला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अपराजिताने खिडकीच्या ग्रिलला गळफास लावला. घरात काही दिवसांपासून तिच्या लग्नाची बोलणी सुरू होती, यामुळे ती तणावात होती. ती नेहमी आपल्या मैत्रिणींना म्हणायची की, मी दिसायला जास्त सुंदर नाहीये. लग्नासाठी घरच्यांना खूप पैसे लागतील, सासरी गेले तर त्रासच होईल.

 

सुसाइड नोटमध्ये लिहिले हे सर्व...
- लालपूर पोलिसांचे म्हणणे आहे की, विद्यार्थिनी अपराजिता चतरा जिल्ह्याच्या रामपूर गावातील राहणारी होती. ती रांचीमध्ये राहून SSC (स्टाफ सिलेक्शन कमिशन) स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती.
- येथील अमर क्लासेसमध्ये तयारी करणाऱ्या अपराजिताच्या खोलीत पोलिसांना एक सुसाइड नोटही आढळली आहे.
- तिने लिहिले आहे की, आईचे निधन झाल्यानंतर ती आजारी राहू लागली होती. तिला आतून चांगले वाटत नव्हते.
- घरचे तिचे लग्न लावू इच्छित होते. पण यामध्ये खूप पैसा खर्च झाला असता. यामुळेच ती तणावात होती.
- घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून मी आत्महत्या करत आहे. मी माझ्या आयुष्याला कंटाळले आहे."

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... शेवटच्या स्लाइडवर पाहा व्हिडिओ....

बातम्या आणखी आहेत...