आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहिणीने घेतला गळफास, कारण काय..तर भाऊ म्हणाला, राखी नंंतर बांंधतो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झांसी- भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी आतुर असलेल्या एका 12 वर्षीय बहीणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील झांसी शहरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लालाराम प्रजापती यांना पाच मुली व एक मुलगा आहे.
- रक्षाबंधनच्या दिवशी दुपारी कविताने (12) तिचा भाऊ अभिजीत (15) याला राखी बांधून घे, असे म्हटले. पण तो त्यानेे नकार देऊन मित्रासोबत खेळायला न‍िघून गेला.
- त्याचा कविताला खूप राग आला. ती खोलीत गेली आणि तिने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.

भावाला राखी बांधून कविताला जायचे होते ट्यूशनला...
- मृत कविताची मोठी ब‍हीण गीता हिने सांगितले की, ती सकाळी मंदिरात गेली होती.
- तिला ट्यूशनला जायचे होते. त्यामुळे अभिजितला राखी बांधण्यासाठी ती घाई करत होती.
- पण, अभिजितने तिच्याकडून राखी बांधून घेतली नाही. तो मित्रासोबत खेळायला निघून गेला.
- त्याचा तिला प्रचंंड राग आला. ती खोलीत गेली आणि तिने काही कळण्याच्या आत गळफास घेऊन आत्महत्या केली.

बहीणीच्या मृत्यू नंतर काय म्हणाला भाऊ...
- बहिणीने आत्महत्या केल्याचे समजताच अभिजित धावत पळत घरी पोहोचला.
-तो म्हणाला, 'मी जगातील कमनशीबी भाऊ आहे.'
- कविता इतकी हळव्या मनाची असेल आणि इतके टोकाचे पाऊल उचलेल, याची कल्पना नव्हती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...