आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रेनमध्‍ये GF ने केला जुन्‍या BF च्‍या हत्‍येचा प्रयत्‍न, नवीन BF ने केली मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- मुगलसराय येथून पटणामध्‍ये येणा-या ट्रेनमध्‍ये एका युवतीने तिच्‍या आधीच्‍या प्रियकराची हत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला. दिल्लीहून येणा-या प्रियकराला भेटण्‍यासाठी ती मुगलसराययेथील ट्रेनमध्‍ये बसली होती. तिच्‍या सध्‍याच्‍या प्रियकराला सोबत घेऊन ती प्रवास करत होती. ट्रेन काही अंतरावर निघाल्‍यानंतर तिने तिच्‍या प्रियकराची हत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला. तिच्‍या प्रियकराला ती वारंवार ट्रेनच्‍या गेटवर घेऊन जात होती.
रूपेश (बदललेले नाव) याने माहिती दिली की, प्रियंका (बदललेले नाव) आपल्‍याला वारंवार ट्रेनच्‍या गेटजवळ घेऊन जात होती. मात्र, हा प्रकार इतर प्रवाशांच्‍या लक्षात आल्‍याने तीचा कट अपयशी ठरला. असे चार ते पाच वेळा झाले. पुन्‍हा ती मला दरवाजाजवळ घेऊन गेली. तेव्‍हा तिथे कोणीच नव्‍हते हीच संधी पाहून तिच्‍या एका सहका-याने चाकूने सपासप वार केले. मला ट्रेनमधून धकलून देण्‍याच्‍या प्रयत्‍नात ते होते.
मुलीने चावा घेऊन तोडला मुलाचा कान..
रुपेश म्‍हणाला की, ट्रेनमधून ढकलून देण्‍याच्‍या प्रयत्‍नात माझी पकड सुटावी म्‍हणून प्रियंकाने मला जोरदार चावा घेतला. त्‍यामध्‍ये माझा कान तुटला आहे. माझ्या कानाचा एक तुकडा तिच्‍या तोंडात राहिला होता. माझ्या समोरच तिने तो थुंकला. दरम्‍यान तिच्‍या नवीन प्रियकराने माझ्यावर चाकूने वार केले. काही लोकांनी माझे प्राण वाचवले. तिचा नवीन प्रियकर हा एयरफोर्समध्‍ये आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...