आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Used Picture Of Ex MLA Daughter To Create Fake Facebook Profile

मुलांशी अश्लिल गप्पा मारण्यासाठी तिने वापरला सुंदर मैत्रिणीचा फोटो, गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - फेसबुक युजर्स सावधान! फेसबुकवर तुमचा फोटो वापरून फेक अकाऊंट बनवले जाऊ शकते. एवढेच नव्हे तर त्याचा वापर बेकायदेशीर कामांसाठीही केला जाऊ शकतो. कारण बंगळुरूमध्ये नुकतेच असे एक प्रकरण उघडकीस आले आहे. एका तरुणीने तिची मैत्रिण आणि माजी आमदाराच्या मुलीचा फोटो आपल्या प्रोफाईलवर अपलोड केला. मुलांशी अश्लिल गप्पा मारण्यासाठी ती या फोटोचा वापर करीत होती. आमदाराची मुलगी दिसायला सुंदर आहे, म्हणून तिच्या फोटोचा या मुलीने असा गैरवापर केला.

काय आहे प्रकरण
सागर येथील माजी आमदार बेलूर गोपाळकृष्णन यांची मुलगी मेघा वंदना हिने जेव्हा आपला फोटो फेसबुकवरील एका प्रोफाईलला पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला. एवढेच नाही तर या प्रोफाईलचा वापर करून संबंधीत व्यक्ती इतर मुलांशी अश्लिल चॅटींग करत असल्याचेही तिच्या लक्षात आले. मात्र जेव्हा या आरोपीला अटक झाली तेव्हा मेघाला अजून एक मोठा धक्का बसला. कारण ही आरोपी व्यक्ती कोणी दुसरी तिसरी व्यक्ती नसून तिच्याच शाळेतील मैत्रिण प्रतिमा होती.

असे उघडकीस आले प्रकरण
मेघाचे काही मित्र छद्म नावाने फेसबुक अकाऊंटशी चॅट करत होते. या दरम्यान त्यांनी मेघाच्या फेक अकाऊंट वापरणार्‍या प्रतिमाशीही चॅट केली. यानंतर त्यांनी याबद्दल मेघाशी संपर्क साधला. मात्र आपण अशी कोणतीच चॅट केली नाही असे मेघाने सांगितल्यावर हे प्रकरण उघडकीस आले.

मेघाने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, माझा फोटो वापरून कोणीतरी व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही इतर मुलांशी अश्लिल संभाषण करत आहे. जेव्हा मेघाने या व्हॉट्सअप नंबरची माहिती मागवली, तेव्हा हा नंबर प्रतिमाचाच असल्याचे कळाले.
आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
मेघाने या संदर्भात पोलिसांमध्ये प्रतिमा विरोधात तक्रार केली आहे. प्रतिमा माझा फोटो वापरून इतर मुलांशी अश्लिल चॅट करत आहे. यामुळे माझ्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी प्रतिमावर फसवेगिरी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

फोटो : आरोपी प्रतिमा आणि माजी आमदाराची मुलगी मेघा