आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री मैत्रिणीसोबत पाहिला सनम तेरी कसम हा चित्रपट, त्यानंतर या युवतीने केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रितिकाने चित्रपट पाहिल्यानंतर आत्महत्या केली. - Divya Marathi
प्रितिकाने चित्रपट पाहिल्यानंतर आत्महत्या केली.
इंदूर- उज्जैन येथील कार्तिक चौकात राहणाऱ्या एका मुलीने आपल्या मित्राच्या आणि त्याच्या दारुडया मित्रांच्या त्रासाला वैतागून आत्महत्या केली. रात्री तिने आपल्या मित्रासोबत मोबाईलवर चित्रपट पाहिला आणि सकाळी तिने त्याला घरी पाठवून आत्महत्या केली. सकाळी पुजेसाठी घरी पंडितजी आल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. पोलिसांना घटनास्थळी आत्महत्येपूर्वी या मुलीने लिहिलेली चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत तिने आपल्या प्रेमप्रकरणाचा उल्लेख केला आहे.
 
पुजाऱ्यास दिसली गळफास घेतलेल्या स्थितीत
- पोलिसांनी सांगितले की, प्रितिका उर्फ चिंकी जोशी असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या युवतीचे नाव आहे. तिच्या वडिलांचे 1 वर्षापूर्वी निधन झाले आहे. ती आपला भाऊ आणि आईसोबत कार्तिक चौकात राहत होती. तिचा भाऊ भोपाळला आईचे ऑपरेशन करुन घेण्यासाठी तिला घेऊन गेला होता. ती घरी एकटीच असल्याने रात्री तिच्यासोबत तिची मैत्रीण सलोनी होती.
सकाळी ती आपल्या घरी निघून गेली होती.
- सलोनी घरी गेल्यानंतर थोड्या वेळाने पंडितजी त्याच्या घरी पुजा करण्यासाठी आले. त्यांनी बराच वेळ दरवाजा वाजवला. बऱ्याच वेळानंतरही दरवाजा न उघडल्याने त्यांनी शेजारी राधेश्याम शर्मा यांना आवाज दिला. शर्मा आणि सलोनीने आवाज दिल्यानंतरही दरवाजा उघडला जात नव्हता. त्यानंतर त्यांनी मागच्या दरवाजातून जाऊन आत पाहिले असता त्यांना प्रितिकाने गळफास घेतल्याचे दिसले.
- शर्मा यांनी चाकूने दोर कापून प्रितिका हिला खाली उतरवले. तिला खाली उतरवले तेव्हा ती जीवंत होती. त्यामुळे तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी करुन तिला मृत घोषित केले. 
 
आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
- महाकाल पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शकुंतला डोडवे यांनी सांगितले की, प्रितिका बुधवारिया येथील एका एनजीओत काम करत होती. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपण विनोद उर्फ वीनूवर प्रेम करत असल्याचे लिहिले आहे. त्याचे मित्र सोनू, सन्नी त्याला दारु पाजत. तो माझे ऐकत नसल्याने मी हे जग सोडून जात आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. वीनू गुदरी या गावाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सन्नी हा महाकाल मंदिराच्या पुजाऱ्याचा मुलगा आहे. या तरुणांबद्दल पोलिस माहिती मिळवत आहेत.
 
आत्महत्येपूर्वी हा सनम तेरी कसम हा चित्रपट
- शेजारी राहणाऱ्या सलोनी या युवतीने सांगितले की 4 दिवसांपासून चिंकीच्या घरी कोणीच नव्हते. ती एकटीच होती. आईने सांगितल्याने मी चिंकीच्या घरी झोपण्यास जात होते. रात्री आम्ही मोबाईलवर सनम तेरी कसम हा चित्रपट पाहिला. त्यानंतर मी झोपले. सकाळी मला चिंकीने उठवले आणि कॉलेजला जाण्यास सांगितले. त्यानंतर ती गळफास लावून घेतला. तिने असे का केले हे मला समजलेले नाही.
 
आईचे भोपाळमध्ये होते ऑपरेशन पण...
- चिंकीच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. तर एका बहिणीचे लग्न झाले आहे. घरी आई ममता जोशी आणि भाऊ होता. चिंकीचा भाऊ त्याच्या आईला घेऊन भोपाळला गेला होता. तिथे कंबरदुखीमुळे त्याच्या आईचे ऑपरेशन होणार होते. चिंकीने आत्महत्या केल्याने त्या ऑपरेशन न करताच घरी परत आल्या आहेत.
 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणखी माहिती
बातम्या आणखी आहेत...