आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: नाटकासाठी Bikini घालून आली मुलगी, रंगमंचावरच बदलले कपडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर (राजस्थान) - जवाहर कला केंद्रात जयरंगम महोत्सवात 'थोडा ध्यान से' एकांकिका सादर झाली. या एकांकिकेत अभिनेत्री मल्लिका तनेजाने विविध वस्त्र परिधान करुन प्रश्न उपस्थित केला, की महिलेने कोणते कपडे वापरले म्हणजे तिच्यावर अत्याचार होणार नाही.
मंचावर बिकनी परिधान करुन आलेल्या अभिनेत्रीने तिथेच कपडे बदलले यामुळे काही लोक नाराज झाले तर, महोत्सवाच्या संचालकांना नाटकात जे दाखवले गेले त्यात काहीही गैर नाही अशी भूमिका घेतली आहे.
नाटकाची नायिका टू पीस बिकनी परिधान करुन मंचावर अवतरते आणि म्हणते, आज समाजामध्ये असेही कपडे वापरले जात आहेत. त्यानंतर ती विविध पद्धतीचे वस्त्र परिधान करते. कथा जसजशी पुढे सरकत जाते, ती सांगत जाते की समाजात महिला प्रत्येक पद्धतीचे कपडे वापरतात. त्यांनी नेमके कोणते कपडे वापरावे ज्यामुळे त्यांच्यावर अत्याचार होणार नाही, लोकांच्या वाईट नजरा त्यांना छळणार नाही.
प्रेक्षकांना खटकले
महोत्सवातील प्रेक्षकांना नाटकातील कलाकाराने टू पीस बिकनी परिधान करुन मंचावर येणे आवडले नाही. त्यांचे म्हणणे होते, की हे सर्व सिनेमापर्यंत ठीक आहे. रंगमंचावर अशा पद्धतीचे कपडे घालणे योग्य नाही.
नाटकाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे - आयोजक
महोत्सवाचे संयोजक नरेंद्र अरोरा म्हणाले, नाटक हा समाजाचा आरसा आहे. यात तेच दाखवले जाते जे समाजात घडत आहे. नाटकाचे काम समाजातील वाईट गोष्टी मांडणे आहे. त्या सुधारण्याचे काम समाजाने करायचे आहे. नाटक प्रश्न उपस्थित करत असते, त्याचे उत्तर आपल्याला समाज म्हणून शोधायचे असते.
पुढील स्लाइडमध्ये छायाचित्रातून पाहा एकांकिका