आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपा आमदारावर आरोप करणाऱ्या युवतीचा खून, स्थानिक युवकांवर आरोपपत्र दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - समाजवादी पक्षाचे आमदार अरुण वर्मा यांनी एका युवकासह २०१३ मध्ये आपल्यावर बलात्कार केला होता, असा आरोप करणाऱ्या २२ वर्षीय युवतीचा सुलतानपूर येथील तिच्या घराजवळ खून करण्यात आला. ही युवती शनिवारपासून बेपत्ता होती. जयसिंगपूरमधील एका शाळेजवळ ती रविवारी मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी सांगितले की, तिच्या मानेभोवती जखम आढळली. त्यावरून तिचा खून करण्यात आला असावा, असे वाटते.
 
मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून महिलेचे कॉल रेकाॅर्ड तपासत आहेत. समाजवादी पक्षाचे आमदार अरुण वर्मा यांनी इतरांसह आपल्यावर सप्टेंबर २०१३ मध्ये बलात्कार केला होता, असा आरोप या युवतीने केला होता. मात्र, त्यानंतर तिने आपला आरोप मागे घेतला होता. पोलिसांनी तपास करून काही स्थानिक युवकांवर आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी अजूनही सुरू आहे. वर्मा हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सुलतानपूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.
बातम्या आणखी आहेत...