आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूआधी तरुणीने लिहिली चिठ्ठी; काय-काय केले घरच्यांनी तिच्यासोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - यूपीच्या कानपूरमध्ये 12वीत शिकणाऱ्या एका तरुणीने आत्महत्या केली. मृतदेहाजवळ एक सुसाइड नोट आढळली आहे. यात तिने घरच्यांबाबत लिहिले की, मी सर्वांवर प्रेम करते, पण माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही. यासाठी मी आत्महत्या करत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- नौबस्ता परिसरात राहणारे बर्मन प्रायव्हेट नोकरी करतात. कुटुंबात त्यांची पत्नी विनीता, मुलगी माधुरी (17), मुलगा शुभम आहे.
- कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. हे कुटुंब कानपूरच्या रसुलाबादमध्ये राहत होते, तर मुलगी आजी-आजोबांकडे गावात राहून शिकत होती. दिवाळीनंतर भाऊबिजेला ती कानपूरला गेली होती.
- मृत मुलींचा भाऊ शुभम म्हणाला, शुक्रवारी दुपारी मी घरात आलो तेव्हा खोलीचा दरवाजा बंद होता, परंतु त्यावर कडी लावलेली नव्हती. दाराला धक्का दिला तेव्हा माधुरी पंख्याला  लटकलेली आढळली.
- मृतदेहाजवळ एक सुसाइड नोट आढळली. यात लिहिलेले आहे की, मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करत होते, पण माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही.
- मृत मुलीच्या आई म्हणाली- मुलगी खूप समजदार होती. तिने फाशी का घेतली, काहीच कळत नाहीये. आम्ही माधुरीवर जिवापाड प्रेम करत होतो. दिवाळीसाठीही तिला येथे आणले होते.
 
अशी होती सुसाइड नोट
- मृत मुलीने सुसाइड नोट लिहिली- मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते. पण माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही. म्हणून मी आत्महत्या करत आहे. मला माफ करा. अंकिता दीदी- भावजी, मम्मी-पप्पा, भाऊ, आजी-आजोबा, काका-काकू, राहुल, लाली, शिवम, अर्जुन, गीता, ऊर्मिला, मामा....
तुमची माधुरी!"
- इन्स्पेक्टर मनोज रघुवंशी म्हणाले, मुलीन आत्महत्या केली. तिच्याजवळ सुसाइड नोटही आढळली. कुटुंबीयांनी कुणावरच आरोप केलेला नाही. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टामॉर्टमसाठी पाठवण्यात आला. जर कुटुंबीयांनी काही तक्रार दिली, तर निश्चितच कारवाई केली जाईल.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...