तरनतारन (पंजाब) - येथील एका 17 वर्षीय युवकाला त्याच्या प्रेयसीने घरी बोलावून आपल्या वडील आणि भावाच्या मदतीने गळघोटून ठार केले. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी तरुणी, तिचे वडील आणि भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अवतारसिंग असे मृताचे नाव आहे.
काय सांगून गेला होता अवतार...
अवतारसिंगच्या वडिलांनी सांगितले, ''मित्राच्या लग्नासाठी जात असल्याचे सांगून 9 जानेवारीला तो घराबाहेर पडला. नंतर घरी आलाच नाही. दोन दिवसानंतर आम्ही पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्याच वेळी बाजूच्या गावात एका अनोळखी युवकाचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळला. तपासात हा मृतदेह माझ्याच मुलाचा असल्याचे स्पष्ट झाले.''
एकाच शाळेत शिकत होते दोघे
अवतार आणि त्याची प्रेयसी सुखविंदर कौर हे एकाच शाळेत शिकत होते. दरम्यान, त्यांचे प्रेमसंबंध जुळले. ही बाब सुखविंदरच्या कुटुंबियांना माहिती पडताच ते खवळले. त्यांनी तिचे मन वळून तिला अवतारला फोन करायला लावला. 9 जानेवारीला अवतार तिच्या घरी गेला. नंतर त्या तिघांनी मिळून त्याचा गळाघोटला आणि गावाबाहेर मृतदेह पेटवून दिला. परंतु, काही व्यक्तींनी अर्धवट जळालेला मृतदेह पाहिला. त्यांनी पोलिसांना माहिती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...