आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTO : शिक्षक म्हणाले अन् मुलींनी निरोप समारंभात हाती घेतल्या दारुच्या बाटल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - येथील सेंट पॅट्रिक्स स्कूल (एसपीएस)मध्ये 12वीच्या विद्यार्थिनींच्या निरोप समारंभाच्या पार्टीत दारुच्या बाटल्यांचा स्टॉल सजवलेला होता. मुख्याध्यापिकेच्या उपस्थितीत मुली दारुच्या बाटल्यांमध्ये असलेले ज्यूस आणि कोल्ड्र ड्रींक्स प्यायल्या. जोरदार फोटो सेशनही केले. पार्टीची IDEA ही शिक्षकांची होती. ती प्रत्यक्षातही त्यांनीच आणली. एका विद्यार्थिनीने हे फोटो सोशल मिडियावर अपलोड केले आणि ते व्हायरल होताच हंगामा झाला.
फोटो - सोशल मिडियावर शेअर झालेले फोटो.

शाळेतील व्यवस्थापन याबाबत स्पष्टीकरण देत आहे. मुलींसाठी बीच थीमवर आयोजित पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी रिकाम्या बाटल्या सजवण्यात आल्या होत्या. त्यात दारू नव्हती, असे सांगण्यात आले. या प्रकारानंतर पालकही हैराण झाले आहेत. अशा प्रकारच्या पार्टीचे आयोजन करून शाळा मुलांना कोणता संदेश देऊ इच्छिते असा सवाल पालकांनी केला आहे.
शुक्रवारी ही पार्टी झाली आणि त्याचे फोटो मंगळवारी समोर आले. पार्टी ‘बीच थीम’ वर आधारित होती. त्यात मॉकटेल आणि आईस्क्रीमचे स्टॉल लावण्यात आले होते. कोल्डड्रींक्स आणि आईस्क्रीम बरोबरच दारुच्या बाटल्याही मांडल्या होत्या. पार्टीसाठी 11वीच्या विद्यार्थिनींकडून 400 आणि 12वीच्या विद्यार्थिनींकडून 300 रुपये घेण्यात आले. शिक्षक सबाह सिद्दीकी यांनी केवळ बाटल्या होत्या, त्यात दारू नव्हती असे स्पष्टीकरण दिले.

कोणाचा जीव तर नाही घेतला-मुख्याध्यापिका
शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जोशिना यांना जेव्हा याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी उलटे उत्तर दिले. आम्ही असा कोणता गुन्हा केला आहे. केवळ पार्टी आयोजित केली होती. कोणाचा जीव तर घेतला नाही ना असे त्या म्हणाल्या.
पुढील स्लाइडवर पाहा, PHOTO