आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: सुरु झाली गरब्याची धूम, तरुणींनी डीजेच्या तालावर केला जोरदार डान्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्तीसगड)- नवरात्री सुरु व्हायला अजून अवकाश असला तरी या शहरात गरबा पार्टी सुरू झाली आहे. येथील मॅग्नेटो मॉलमध्ये तरुणी आणि महिलांसाठी गरबा आयोजित करण्यात आला होता. डीजेच्या तालावर जेव्हा पारंपरिक वेशातील तरुणींनी गरबा सुरू केला तेव्हा उपस्थितांनी एकच ताल धरला.
सुरवातील स्लो स्टेप्ससह सुरू झालेला गरबा जरा वेळाने चौकडी, छकडी, घोडा अशा गतीने वाढत गेला. पंखिडा, नगाडेसोबत ढोल बाजे, नदिया किनारे, ढोलितारो सारख्या सदाबहार गीतांवर तरुणींनी एकच रंगत आणली. त्यानंतर इतरही नागरिक गरब्यात सहभागी झाले. पारंपरिक स्टेप्ससह तरुणींनी फ्री स्टाईल, ठुमके, सालसा, बॅले स्टेप आणि फ्युजन गरबा नृत्यही केले. यासाठी तरुणींना कोरियोग्राफर शबनम यांनी सात दिवसांचे प्रशिक्षण दिले होते.
पुढील स्लाईडवर बघा, गरबा नृत्यातील वेगवेगळे प्रकार... पारंपरिक वेशातील महिला स्पर्धक...