आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांपेक्षा मुली करिअरबद्दल असतात नेहमी दक्ष : अझीम प्रेमजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- जगभरात प्रतिष्ठाप्राप्त विप्रो या कंपनीचे प्रमुख अझीम प्रेमजी यांनी शनिवारी एका समारंभात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. निमित्त होते विप्रोच्या पुरस्कार वितरण समारंभाचे. आपल्या करिअरबद्दल मुलांपेक्षा मुलीच अधिक दक्ष असतात, मात्र त्यांना त्यांच्या पालकांचे पाठबळ मिळायला हवे, असेही प्रेमजी म्हणाले.

िवशेषत: छोट्या गावांतील मुलींना एकदा त्यांच्या पालकांचे प्रोत्साहन िमळाले की त्या करिअरबद्दल आणखी गांभीर्याने विचार करतात. दुर्दैवाने आज बहुतेक पालक आपल्या मुलींना धाकट्या भावंडांची काळजी घेण्याची जबाबदारी देऊन गंुतवून ठेवत असल्याचे चित्र दिसते. याचे कारण म्हणजे वडिलांच्या कमाईत आपणही वाटा टाकावा म्हणून  बहुतेक माता नोकरी, रोजगारासाठी सकाळीच घराबाहेर पडतात. मग साहजिकच छोट्यांची जबाबदारी घरातील मोठ्या मुलीवर येते, असे वास्तववादी चित्र प्रेमजी यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.

प्रेमजी म्हणाले, मी गावागावांतील अनेक शाळांमध्ये, महाविद्यालयांत िफरलो आहे. तेथील शिक्षणपद्धती, त्या महाविद्यालयांतील अभ्यासक्रम आणि या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थिनींची संख्या पाहता मुली या निवडीतही स्मार्ट होत चालल्याचे दिसले. प्रत्येक वेळी मला मुली मुलांपेक्षा प्रत्येक क्षेत्रांत सरस हाेत चालल्या असल्याचे जाणवले. आताच उदाहरण पाहा ना, समोरून जे प्रश्न मला विचारले जात आहेत त्यात दर्जेदार आणि वैचारिक प्रश्न कोण विचारतो आहे याचा विचार करा. तुम्हाला कळेल मुली कशा दक्ष आहेत. मुलांपेक्षा मुली किती हुशारीने प्रश्न विचारत  आहेत ते पाहा. एवढेच नव्हे, ज्या ज्या शाळांमध्ये गुणवत्तेची क्रमवारी जाहीर केली जाते त्यातही एका वर्गात पन्नास टक्के पुरस्कार मुलीच घेऊन जात असल्याचे चित्र दिसेल, असे उदाहरणही प्रेमजी यांनी सांगितले.

माझा शालेय जीवनातील वेळ अंगठे धरण्यातच गेला...
- मी शाळेत होतो तेव्हा खूप खोडकर होतो. त्यामुळे माझ्या शालेय जीवनातील बहुतांश वेळ वर्गाबाहेर अंगठे धरून  उभे राहण्यातच गेला, अशी गमतीदार आठवणही प्रेमजी यांनी जागवली.
- प्रेमजी यांना शिक्षणाच्या काळात कॉलेज सोडावे लागले होते. याबाबत विद्यार्थ्यांनी विचारले तेव्हा प्रेमजी म्हणाले, माझ्या वडिलांचे अकाली निधन झाले. त्यामुळे त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या माझ्यावर येऊन पडल्या. मात्र, उशिरा का होईना मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. नंतर यात मास्टर ही पदवीही संपादन केली.
बातम्या आणखी आहेत...