आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: येथे तरुणांना काठीने मारतात तरुणी, ज्याला लागली त्याचे ठरते लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूरः जवळपास शंभर वर्षांपेक्षाही जुनी परंपरा अजूनही जोधपूरमध्ये साजरा केली जाते. धींगा गवर नावाची या परंपरेनुसार मुली अविवाहित मुलांना काठीने पळवून पळवून मारते. या परंपरेनुसार काठी ज्या कोणत्या मुलाला लागेल त्या मुलाचे लग्न लवकरच होते. बदलत्या काळानुसार आता ही यात्रा शहराची पारंपरीक यात्रा बनली आहे. काठीमार गणगौरच्या रुपात ओळखल्या जाणाऱ्या या जत्रेबद्दल जाणून घ्या माहिती...


काठी लागली तर विवाह नक्की
मारवाडपासून जवळपास 80-100 वर्षापूर्वी असे मानत होते की, धींगा गवरचे दर्शण पुरूष घेत नव्हते. कारण तत्कालिन समाजात असे मानण्यात येत होते की, जो कोणी धींगा गवरचे दर्शन घेईल त्याचा मृत्यू होईल. अशावेळी धींगा गवरची पूजा करण्यासाठी सौभाग्यवती आपल्या हातात वेताची काठी घेऊन अर्ध्यारात्री गवरसोबत निघत. त्या महिला रात्रभर गाणे गात आणि वेताच्या काठीने मारत चालत राहायच्या. असे म्हणतात की, त्या महिला काठी यासाठी आपटायच्या, जेणे करून पुरूष सावधान होईल आणि गवरचे दर्शन न घेता एखाद्या दुसऱ्या गल्लीतून निघून जातील. कालांतराने ही मान्यता पसरली की, ज्या कोणत्या पुरूषाला या काठीचा मार बसेल त्याचे लग्न लवकर होईल. आता हीच परंपरा तरूणवर्गाचा अविभाज्य भाग बनली आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, काठीमार सोहळ्याचे इतर काही मजेदार फोटो...