आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीला विवस्त्र डान्स करायला भाग पाडले; माउंट अबू येथील धक्कादायक प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरोही- राजस्थानातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ माउंट अबू येथे एका युवतीला रुपये देऊन विवस्त्र डान्स करायला भाग पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 'पौर्णिमा वाटिका' या हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. हॉटेलच्या संचालकांनेच पीडितेला रुपये देऊन तिला विवस्त्र डान्स करण्यास जबरदस्ती केली. पीडितेने त्याला विरोध केल्यास त्याने तिला बेदम मारहाण केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी हॉटेल संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रांनीनुसार मिळालेली माहिती अशी की, पीडिता गुजरातमधील अहमदाबाद येथील रहिवासी आहे. पीडिता आणि तिच्या दोन मैत्रिणी 21 जूनला माउंट अबू येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. ओरिया येथील हॉटेल 'पौर्णिमा वाटिका' येथे रुम भाड्याने घेतली. 22 जूनला तिघींनी दिवसभर भटकंती केली. रात्री हॉटेलवर आल्यानंतर हॉटेलच्या संचालकाने पीडितेला 15 हजारांत डान्स करण्‍याची ऑफर दिली. पीडितेने ही ऑफर स्विकारली. परंतु आरोपीने आपले शब्द फिरवले आणि तिला विवस्त्र डान्स करण्यास भाग पाडले. पीडिते त्याला विरोध केल्यास तिला बेदम मारहाणही केली. तसेच तिच्याकडून सगळे रुपये हिस्कावून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीचे नाव गोपनिय ठेवले आहे.