रेवाडी / महेंद्रगड - पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मिर मधील जलप्रलयामुळे त्यांच्या समर्थकांना वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले होते. वाढदिवस साजरा करण्याऐवजी किंवा भेटवस्तू न देता ते पैसे पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी द्यावेत असे त्यांनी सांगितले होते. मात्र, बुधवारी हरियाणाच्या भाजप कार्यकर्त्यांनी
आपल्या नेत्याचे म्हणणे नजरेआड केल्याच्या पाहायला मिळाले. येथे भाजपचे दोन चेहरे पाहायला मिळाले. रेवाडी येथील कोसली येथे नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित एका कार्यक्रमात तरुणी ठूमके लगावताना दिसल्या तर, कार्यकर्ते त्यांच्यावर दौलत जादा करत होते. विशेष म्हणजे हा कार्यक्रम भाजप महिला नेत्या प्रिती यादव यांनी आयोजित केला होता.
रेवाडीच्या कार्यक्रमावरून टीका होऊ लागल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्षांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रिती यादव यांना कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यानंतरही त्यांनी स्वतः तो कार्यक्रम घेतला, असे सांगत भाजपन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. रामविलस शर्मा यांनी मोदींच्या वाढदिवसानिमीत्त महेंद्रगड येथील अग्रसेन चौकात यज्ञाचे आयोजन केले होते. पंतप्रधानांना दिर्घायूष्य लाभावे अशी प्रार्थना त्यांनी केली. त्यासोबतच पूरग्रस्तांसाठी पैसे जमा करण्याच्या कार्यक्रमाचेही उदघाटन केले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, रेवाडी येथे प्रिती यादव यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची छायाचित्र