आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Girls Passengers Were Dragged Out Of Vehicles And Raped At At Murthal In Haryana

जाट आंदोलन: तरुणींना कारमधून ओढले, नंतर शेतात नेऊन केला बलात्‍कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो  रोहतकचा आहे. तेथे जमावाने कारला घेराव घालून ती पेटवून दिली होती. - Divya Marathi
हा फोटो रोहतकचा आहे. तेथे जमावाने कारला घेराव घालून ती पेटवून दिली होती.
पानीपत (हरियाणा) - जाट आंदोलनाचा भडका शांत झाला. परंतु, या आठवड्यात आंदोलनाच्‍या नावाखाली झालेली लूटमार, जाळपोळ, अत्‍याचार याची धग अजूनही कायम आहे. आंदोलकांचा अशाच एक क्रुर कारनामा समोर आला असून, यामुळे समस्‍त पुरुष जातीची नाच्‍चकी झाली. त्‍याचे झाले असे, आंदोलनादरम्‍यान हरियाणातील मुर्थल येथे 25 ते 30 नराधामांनी एका कारमध्‍ये बसलेल्‍या तरुणींना घेराव टाकला आणि जवळच्‍या शेतात त्‍यांच्‍यावर सामूहिक बलात्‍कार केला. या बाबत एका इंग्रजी वृत्‍तपत्राने वृत्‍त दिले. काय म्‍हटले वृत्‍तात...

> सुरुवातील 25 ते 30 जणांच्‍या टोळक्‍याने राष्‍ट्रीय महामार्गावर एकवरील एका ढाब्‍याला आग लावली आणि नंतर रस्‍त्‍यावर धावणाऱ्या गाड्यांना अडवून त्‍यांना पेटवून दिले.
< याच दरम्‍यान रस्‍त्‍यावरून जाणाऱ्या एका कामध्‍ये त्‍यांना तीन तरुणी दिसल्‍या. त्‍यांच्‍यासोबत त्‍यांचे कुटुंबीयसुद्धा होते.
> या नराधमांनी कारला घेराव टाकला.
< नंतर तरुणींना बाहेर काढून त्‍यांना बाजूच्‍या शेतात नेले आणि सामूहिक बलात्‍कार केला.
> हे प्रकरण येथेच थांबले नाही तर पोलिसांकडे न्‍याय मागायला गेलेल्‍या तरुणी आणि त्‍यांच्‍या कुटुंबीयांना पोलिस म्‍हणाले, या प्रकरणी कुणालाच काही सांगू नका, असा दम काही पोलिसांनी भरला.
> या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी पोलिसांना पत्र लिहून आरोपींवर कारवाई करण्‍याची मागणी केली.
< या घटनेपूर्वीही अनेक महिलांनी सांगितले की, आपल्‍यासोबत आंदोलनाच्‍या नावावर छेडछाड झाली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पोलिस काय म्‍हणाले.... ढाबा मालक म्‍हणाला बलात्‍कार झाला... तक्रार का दिली नाही...