आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदरशामध्ये मुला-मुलींनी एकत्र शिकणे हे \'पाप\' असल्याचे सांगत थांबवले प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : बिहारशरीफमध्ये अजिजिया मदरशाबाहेर आंदोलन करणा-या विद्यार्थिनी

बिहारशरीफ - येथील सरकारी अनुदानितअजिजिया मदरशामध्ये धर्माचे कारण पुढे करत मुलींच्या प्रवेशावर बंदी लावण्यात आली आहे. तसेच याठिकाणी आधीपासून ज्या मुली शिकत होत्या, त्यांच्या मदरशातील प्रवेशावरही बंदी लादण्यात आली आहे. मुला-मुलींना मदरशात एकत्र शिकवणे आणि मुलींना पुरुष शिक्षकाने शिकवणे हे धर्माच्या विरोधात असल्याचे मदरशाच्या सचिवांचे म्हणणे आहे. सोगरा वक्फ स्टेट कमिटी हा मदरसा चालवते. या कमिटीच्या अध्यक्षांच्या मते त्यांना अशा प्रकारच्या कोणत्याही आदेशाची माहिती नाही. दरम्यान, विद्यार्थिनींनी या निर्णयानंतर तीव्र निदर्शने केली.

'एकत्र शिकणे हे पाप'
सोगरा वक्फ स्टेटचे मुतवल्ली या मदरशाचे सचिव असतात. विद्यमान सचिव एस.एम. शरफ यांनी सांगितले की, मुला मुलींनी एकत्र शिकणे आणि त्याबरोबरच पुरुषांनी मुलींना शिकवणे हे धर्माच्या विरोधी आहे. हे पाप आहे आणि हे पाप केले जाऊ शकत नाही, कारण मदरशामध्ये धर्माबाबत शिक्षण दिले जाते. आधी येथे अवैधरित्या मुतवल्ली बनलेले होते. त्यांनी मुला मुलींचे एकत्र शिक्षण सुरू केले होते. पण आता पद्धत बदलणार आहे. जोपर्यंत महिला शिक्षिका नियुक्त केली जात नाही, तोवर मुलींचे शिक्षण बंद राहील.

मुलींची संख्या अधिक
हा आदेश निघण्यापूर्वी अजिजिया मदरशामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अधिक होती. येथे तिस-या वर्गापासून एमए पर्यंतचे शिक्षण दिले जाते. येथील वेतन आणि इतर खर्च सरकारतर्फे दिले जातात. तर विद्यार्थ्यांना बिहार सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांना सायकल, गणवेश आणि इतर सुविधा दिल्या जातात.
भविष्य धोक्यात
मुलींचे प्रवेश बंद करण्याचा आदेश दिल्यानंतर शेकडो मुलींचे भविष्य धोक्यात आले आहे. ज्या मुलींचे पुढील वर्गात प्रवेश होणार आहेत, त्यांना या आदेशाचा सर्वात मोठा फटका बसणार आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित PHOTO