आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girls Found In Human Trafficking In Hotel Marriott Jaipur

विमानाने पिंक सिटीत येत होती ही कॉलगर्ल, 5 स्टार हॉटेलमध्ये चालायचा गोरखधंदा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या जयपूर शहरात पोलिसांनी बेकायदा देहविक्रीचा भांडाफोड केला आहे. शहरातील हॉटेल मॅरियटमध्ये सर्रास सुरु असलेल्या गोरखधंद्याचा रविवारी पोलिसांनी पर्दाफास केला. कॉलगर्लसह एका दलाल पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित कॉलगर्ल विमानाने शहरात येत असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. या कामात मॅरियट हॉटेलमधील कर्मचार्‍यांचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

जवाहर सर्किल ठाण्याचे एसीपी अशोक चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील वीस वर्षीय तरुणी व राजधानी टूर अँड ट्रॉव्हल्स कंपनीचा चालक धर्मा (40, रा. हरियाणा) याला अटक करण्‍यात आली आहे. इंडिगो फ्लाइटने आरोपी कॉलगर्ल 20 जुलै रोजी मुंबईहून जयपूर येथे आली होती. हॉटेल मॅरियटमधील खोली क्रमांक 707 मध्ये ती थांबली होती. प्रतिदिवस 18 हजारप्रमाणे तिच्यासोबत सौदा ठरला होता. खबर्‍याने पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचून कॉलगर्लसह दलाल धर्मा याला पोलिसांनी अटक केली.

पोलिसानी तरुणीच्या सूटकेसमध्ये एक लाख 60 हजार रुपये जप्त केले आहेत. तसेच धर्मा याच्याकडून हॉटेल मॅरियटचे इलेक्ट्रो मॅग्नटिक कार्ड जप्त केले आहे. या कामात साक्षी नामक महिलेची मदत घेण्यात आल्याचे धर्माने पोलिसांना सांगितले. ग्राहकांना हॉटेलपर्यंत पोहोचवण्याचे काम ती करत होती.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सविस्तर वृत्त...