आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागडा मोबाइल चोरल्याच्या आरोपातून विद्यार्थिनीस विवस्त्र करून मारहाण; व्हिडिओ व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुमका- झारखंड येथील दुमका एसपी महिला महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीस मोबाइल चोरल्याचा आरोप ठेवून सहकाऱ्यांनी तिला विर्वस्त्र करत बेदम मारहाण केली. सोमवारी या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही अमानुष घटना उघडकीस आली.  

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थिनीने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पीडितेने मुख्यमंत्र्यांनाही न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे.  

पीडितेने सांगितले, ६ दिवसांपूर्वी मोबाइल चोरीचा आरोप करून माझ्या सहकाऱ्यांनी मला एका खोलीत रात्रभर कोंडून ठेवले. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी एक पंचायत बसवली. यामध्ये १८६०० रुपयांचा दंड ठोठावला आणि दंड न भरल्यास विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. विद्यार्थिनीने या घटनेची माहिती पालकांना कळवली आहे. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी विद्यार्थ्यांकडे २५ ऑगस्टपर्यंतची सवलत मागितली. त्यासाठी जमीन विकावी लागली तरी चालेल; पण दंडाची रक्कम भरण्यास तयार असल्याचे वडिलांनी सांगितले.  

त्यानंतरही या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ व्हायरल केला. प्रकरण पोलिसात गेले. आपण मोबाइल चोरलेला नाही. उलट तिच्याकडे जो मोबाइल आहे, तो मैत्रिणीकडून ५०० रुपयांत विकत घेतला होता. माझ्यावर विनाकारण चोरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. 
 
माझ्या मुलीच्या भवितव्याचे काय?
पीडितेच्या वडिलांनी सांगितले, माझ्या मुलीचे भवितव्य धोक्यात आले आहे. तिचे कसे होईल? तिच्याशी लग्न कोण करेल? तिचे भवितव्य कसे असेल? अाम्हाला गावात तोंड दाखवायला जागा उरली नाही. पंचायतीने ठरवल्याप्रमाणे  दंड भरण्यास तयार आहे. त्यानंतरही त्यांनी असे का केले?

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... घटनेशी संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...