आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girls Leave Hostel Accusing School Official Taking Nude Pictures

शाळेच्या अकाऊंटंटने NUDE PHOTOS काढल्याने 60 मुलींनी सोडले हॉस्टेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहरामपूर - ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत विद्यार्थिनींची अश्लिल छायाचित्रे काढण्याची आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर जवळपास 60 विद्यार्थिनींनी हॉस्टेल सोडले आहे. गेल्या वर्षी शाळेच्या सहलीदरम्यान अकाऊंटंट तुलू भुइयां आणि आचाऱ्याने विद्यार्थिनींची अश्लिल छायाचित्रे काढली होती, असा आरोप आहे. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून, आरोपी अद्याप फरार आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 22 न्यूड आणि सेमी न्यूड फोटो पोलिसांनी जप्त केले ाहेत. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर चाइल्ड वेल्फेअर कमिटीतर्फे आरोपींच्या विरोधात एफआयआर दाखल कऱण्यात आली. दोन्ही आरोपींनी त्यांचा राजीनामा पाठवला आहे तर हॉस्टेलच्या वॉर्डन दीर्घ सुटीवर गेल्या आहेत.

हॉस्टेलमध्ये एकूण 87 विद्यार्थिनी राहत होत्या. ही घटना समोर आल्यानंतर त्यापैकी सुमारे 60 विद्यार्थिनींनी हॉस्टेल सोडले आहे. त्या सर्व सहावी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनी होत्या. या सर्व विद्यार्थिनी मागासवर्गीय गटातील आहेत. तर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या उर्वरित विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला कॉन्स्टेबल तैनात करण्यात आल्या आहेत.