आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतीत जगाताहेत या बहिणी, अवघ्या 25 मिनिटांत झाले होते असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी- येथे टवाळखोरांच्या दहशतीला घाबरून दोन बहिणी आणि त्यांच्या भावाने शाळेत जाने बंद केल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही बहिणी शाळेतून परतत असताना टावाळखोरांनी त्यांना अडवले, त्यांना विरोध करणाऱ्या भावाला जबर मारहाण केली आणि दोघी बहिणींना निर्जणस्थळी नेऊन टावाळखोरांनी त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. कसातरी जीव वाचवत दोघींनी त्यांच्या तवडीतून आपली सुटका करून घेतली आणि घरी पोहोचल्या. पीडित मुलींच्या पालकांनी तक्रार करूनही पोलिसांनी कोणतीही करवाई केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. एवढ्यावरच हे टवाळखोर थांबले नसून त्यांनी फेसबुकवरही धमक्या देण्यास सुरूवात केली असल्याचे कुटुबीयांनी सांगितले.
 
असे आहे प्रकरण... 
- अर्दली बाजार येथे विपुल पाठक (काल्पनिक नाव) हे पत्नी, दोन मुली आणि एका मुलासोबत राहतात.
- तीन्ही मुले जवळच असलेल्या एका शाळेत शिकतात. 23 नोव्हेंबरला काही टवाळखोरांनी त्यांच्या रस्ता अडवत त्यांना निर्जणस्थळी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.
- पीडित एका मुलीने सांगितले की, घरी परतत असताना सहा ते सात टवाळखोरांनी माझ्या भावाला घेतले, त्याला आम्हाला बोलवण्यास सांगितले परंतु, त्याने नकार दिला.
- आम्ही शाळेच्या गेटमागे लपलो होतो. तेव्हा, ते टावाळखोर आमच्याकडे आले आणि माझा आणि माझ्या बहिणीचा हात ओढू लागले. एका निर्जनस्थळी घेऊन जाण्याविषयी ते आपापसात बोलत होते.
- 25 मिनिटे झटापट सुरू होती, त्यानंतर आम्ही कसातरी जीव वाचवून तेथून घरी आलो. तेव्हा आमच्या मदतीसाठी कोणीच समोर आले नाही.
- त्या दिवसानंतर आम्ही खुप घाबरलेलो आहोत. शाळेत जाण्याची हिम्मत होत नाही. माझी बोर्डाची परीक्षा आली आहे, आता कळत नाही कसा आभ्यास होईल.
- वडिलांनी सांगितले की, पत्नीला कर्करोग आहे, उपचारासाठी दिल्लीला घेऊन जायचे होते, परंतु, या घटनेनंतर मुलांना एकटे सोडून जाऊ शकत नाही.
 
पोलिस काय म्हणतात...?
एसपी दिनेश सिंह यांनी सांगितले की, 5 नोव्हेंबरच्या रात्री आरोपी अंकितला अटक करून त्याला जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्....
बातम्या आणखी आहेत...