आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाला रेप करताना रंगेहाथ पकडले गावकऱ्यांनी, विद्यार्थिनीला शिकवत होता म्युझिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित विद्यार्थिनीला शिक्षक म्युझिक शिकवण्याच्या बहाण्याने शाळेच्या एका खोलीत घेऊन गेला होता. (प्रतिकात्मक फोटो) - Divya Marathi
पीडित विद्यार्थिनीला शिक्षक म्युझिक शिकवण्याच्या बहाण्याने शाळेच्या एका खोलीत घेऊन गेला होता. (प्रतिकात्मक फोटो)
सहरसा - बिहारच्या सहरसामध्ये एका शिक्षकाने 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला म्युझिक शिकवण्याच्या बहाण्याने शाळेतील एका रूममध्ये नेले आणि तिच्यावर बळजबरी करायला लागला. भीतीने विद्यार्थिनी ओरडली, परंतु हे ऐकून गावातील लोक जमा झाले आणि शिक्षकाला रंगेहाथ पकडले. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी शिक्षकाला बेदम चोप दिला.
 
मारहाण करून काळे केले तोंड
- ही घटना सहरसा जिल्ह्याच्या बिहरा परिसरातील पटोरी गावातील आहे. येथील सेवाआश्रम कन्या मध्य विद्यालयात गुरुवारी ही घटना घडली.
- गावातील लोकांनी शिक्षक मो. लुकमानला शाळेतीलच 8वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याच्या प्रयत्नात असताना रंगेहाथ पकडले.
- गावकऱ्यांनी शिक्षकाला आधी बेदम मारहाण केली. यानंतर त्याच्यावर रॉकेल ओतून आग लावण्याचाही प्रयत्न केला.
 
पोलिस आल्याने वाचला जीव...
- घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली आणि शिक्षकाचा जीव वाचला. शिक्षकाला संतप्त गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवताना पोलिसांची दमछाक झाली.
- पोलिसांनी आरोपी शिक्षकाला आपल्या ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. तथापि, शिक्षकाला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
म्युझिक शिकवण्याच्या बहाण्याने करणार होता बलात्कार...
- गावकरी म्हणाले, लुकमान मागच्या काही दिवसांपासून 8वीतील मुलीला म्युझिक शिकवण्याच्या बहाण्याने बोलवायचा.
- गुरुवारी लुकमान विद्यार्थिनीला घेऊन शाळेतील एका खोलीत गेला आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करू लागला. भीतीने विद्यार्थिनी रडू लागली, मोठमोठ्याने ओरडू लागली. हे ऐकून गावकरी गोळा झाले. 
- संतप्त लोकांनी रडणाऱ्या विद्यार्थिनीला वाचवले आणि आरोपी शिक्षकाला मारहाण सुरू केली. यानंतर गावकऱ्यांनी त्याच्या तोंडावर काळी शाई फेकली. तसेच अंगावर रॉकेल ओतून पेटवण्याचाही प्रयत्न केला.
- परंतु पोलिस वेळीच पोहोचल्याने त्यांनी शिक्षकाला गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवले आणि ताब्यात घेतले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...