आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी खरेदीवर वितरकाला द्यावे लागतील दोन हेल्मेट नि:शुल्क, दहा वर्षांपूर्वीचा कायदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - केंद्राने दहा वर्षांपूर्वीच दुचाकी वाहन निर्माते आणि वितरकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दुचाकीच्या खरेदीवर ग्राहकांना दोन हेल्मेट नि:शुल्क देण्याचा कायदा बनवला होता, १० वर्षांनंतरही आता कुठे राज्य सरकार यास लागू करण्यास जागे झाले. हाच निर्णय महाराष्ट्रातही व्हायला हवा, तदनंतर हेल्मेटसक्ती झाली तरी हरकत नाही. राजस्थान सरकारने उचललेले हे पाऊल महाराष्ट्र सरकारनेही सक्तीने उचलावे.

केंद्र सरकारने १६ मार्च २००६ ला केंद्रीय मोटारवाहन नियम १९८९मध्ये संशोधन करून देशभरात दुचाकी वाहनांच्या सातत्याने वाढत्या अपघातांकडे पाहता हे पाऊल उचलले होते. यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहन निर्माते आणि वितरकांनी दुचाकीच्या खरेदी आणि पहिल्यांदा डिलिव्हरीच्या वेळी वाहनचालक आणि मागील आसनावर बसणाऱ्या व्यक्तीच्या डोक्याच्या सुरक्षेसाठी दोन हेल्मेट देण्याची तरतूद केली होती. पण दहा वर्षांपर्यंत हा नियम थंड्या बस्त्यात पडून राहिला. राजस्थान राज्य सरकारने दहा वर्षांनंतर राज्यात हा नियम लागू करण्याचा आदेश दिला आहे. परिवहन विभागात आयुक्त पवन कुमार गोयल यांनी न केवळ आदेश जारी केले आहेत, तर परिवहन अधिकाऱ्यांना यासंबंधात नियमांचे पालन होईलच हे पाहण्याचे निर्देश दिले आहेत. या नियमाचे पालन न करणाऱ्या वितरकाविरुद्ध आरटीओ कडक कारवाई करेल.

वितरकांनी केला विरोध, निर्णयानंतरच विक्री
राजा मोटर्सचे अर्पित धूत यांचे म्हणणे आहे की, दुचाकीचे निर्माते या नियमावर सरकारशी चर्चा करत आहेत. सरकार जर काही निर्णय करत नसेल तर वितरक ग्राहकांना या दुचाकीची विक्री व डिलिव्हरी देणार नाहीत. भूत मोटर्सचे भवानीभाई भूत यांचे म्हणणे आहे की, वितरकाकडे दोन हेल्मेट द्यावे एवढे मार्जिनच नसते. यासंबंधी राजस्थान ऑटोमोबाइल्स डीलर्सची जयपुरात बैठक झाली. या गोष्टीचा विरोध केला जाईल. जबरदस्ती हा निर्णय आमच्यावर थोपला तर आम्हाला किमती वाढवाव्या लागतील. हे कामदेखील उत्पादकच-निर्मातेच करू शकतील.