आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Power To Prince, Modi New Remark Make Agressive Environment

शहजाद्यांकडे कारभार द्या, मोदींच्या वक्तव्याने वादंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कवर्धा (छत्तीसगड) - पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप व काँग्रेसमध्ये जोरदार वाक्युद्ध सुरू आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये घेतलेल्या पाच सभांत काँग्रेस व गांधी परिवारावर टीका केली. ‘मॅडम आजारी असतील तर शहजाद्यांवर (राहुल) त्यांनी जबाबदारी सोपवावी’, असे मोदी म्हणाले.
विदेशी वंशाचा मुद्दाही त्यांनी मांडला. ‘छत्तीसगडसाठी निधी मामाकडून आणला होता का?’, असा सवाल त्यांनी केला. यावरून काँग्रेस नेते प्रचंड संतापले आहेत.