आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Ten Days, Special System Develops For The Solving Problem Arvind Kejriwal

दहा दिवस द्या, समस्या सोडवण्‍यासाठी विशेष व्यवस्था विकसित करू - अरविंद केजरीवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझियाबाद - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 10 दिवसांचा अवधी मागितला. ते म्हणाले, ‘जनतेला खोटी आश्वासने मी देणार नाही. आता तर कुठे सत्ता हाती घेतली आहे. समस्या सोडवण्यासाठी आम्हाला एक विशेष व्यवस्था विकसित करावयाची आहे. म्हणून फक्त सात ते दहा दिवसांचा अवधी द्या.’
दहा दिवसांनंतर लोकांच्या तक्रारी व समस्यांसंबंधी निवेदने स्वीकारली जातील असे केजरीवाल म्हणाले. कौशंबीस्थित निवासस्थानी रविवारी शेकडो लोक आपल्या तक्रारी आणि समस्या सांगण्यासाठी दाखल झाले होते. दिल्ली परिवहन महामंडळ (डीटीसी) तसेच महानगरपालिकेतील कर्मचारी मोठ्या संख्येने तक्रारी मांडण्यासाठी आले होते. महापालिका तसेच परिवहन महामंडळातील कंत्राटी पद्धत रद्द करावी, गेल्या काही वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर काम करणा-या कर्मचा-यांना सेवेत कायम करण्यात यावे, अशी त्यांची मागणी होती. सुमारे एक हजार वाहक व चालक ‘अरविंद जिंदाबाद’च्या घोषणा देत केजरीवाल यांच्या निवासस्थानी आले होते.
केजरीवाल यांची प्रकृती सध्या बिघडलेली आहे. तरीही त्यांनी या लोकांसमोर येऊन ‘आप’ सरकार आगामी काळात व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी ठोस कार्यक्रम आखणार असल्याचे सांगितले. यासाठी काही बदल करावे लागतील, असेही ते म्हणाले. लोकांनीही त्यांना प्रतिसाद दिला.
पोलिसांची दमछाक
मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले केजरीवाल यांनी वैयक्तिक सुरक्षा व्यवस्था नाकारली असल्याने त्यांच्या निवासस्थानी रविवारी दाखल झालेल्या जमावाला आटोक्यात ठेवण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. गाझियाबाद पोलिसांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर मेटल डिटेक्टर लावले असून उत्तर प्रदेश पोलिस वाहतूक सांभाळत आहेत. दिल्ली पोलिसांचे एक पथक साध्या वेशात उभे होते.
वडिलांनी मंदिरात केले हवन
केजरीवाल यांना यश मिळावे म्हणून त्यांचे वडील गोविंदराम यांनी एका मंदिरात रविवारी होम-हवन केले. नंतर पत्रकारांना त्यांनी सांगितले, ‘आश्वासने पूर्ण करता यावीत आणि अरविंदलाही शक्ती मिळावी म्हणून हे हवन केले.’
केजरीवाल यांना यश मिळावे म्हणून त्यांचे वडील गोविंदराम यांनी एका मंदिरात रविवारी होम-हवन केले. नंतर पत्रकारांना त्यांनी सांगितले, ‘आश्वासने पूर्ण करता यावीत आणि अरविंदलाही शक्ती मिळावी म्हणून हे हवन केले.’
मोदींनी अमेठीतून लढून दाखवावे : कुमार विश्वास
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी अमेठीतून राहुल गांधी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी दिले. ते राहुलविरुद्ध उभारणार आहेत. घराणेशाहीला मोदींचा खरेच विरोध असेल तर त्यांनी अमेठीतून लढावे, असे विश्वास म्हणाले.
मोदी, केजरीवाल, राहुलसमोर कोण : लालू
मुजफ्फरनगर । राहुल यांच्यासमोर केजरीवाल व मोदी कुणीच नाहीत, अशा शब्दांत लालु प्रसाद यादव यांनी राहुल गांधींवर स्तुतिसुमने उधळली. मीडियानेच या दोघांना चंद्रावर पोहोचवले असल्याचेही सांगून अजून ज्यांनी काहीच केलेले नाही, त्यांना मीडियाने अवास्तव प्रसिद्धी दिल्याचे लालू म्हणाले.
कमाल फारुकी ‘आप’च्या मार्गावर
समाजवादी पक्षाचे माजी नेते कमाल फारुकी यांनी रविवारी केजरीवाल यांची भेट घेऊन आम आदमी पार्टीत प्रवेशाची इच्छा व्यक्त केली. फारुकी यांनी सपाचे राष्‍ट्रीय सरचिटणीसपद सांभाळलेले आहे. केजरीवाल यांच्याशी त्यांनी सुमारे एक तास चर्चा केली. आपल्या सहका-यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, असे केजरीवाल यांनी या भेटीत सांगितल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
‘आप’चे नेते संजयसिंह म्हणाले, केजरीवाल यांनी फारुकींविरुद्ध गुन्हेगारी किंवा भ्रष्टाचारासंबंधी एखादा खटला सुरू आहे काय, याची माहिती घेण्यास सांगितले आहे.