आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीर काचेसारखे, 100 वर वेळा फाटल्या नसा; वाचा मिलिंद रायपुरियाची कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन- ही कहाणी आहे मिलिंद रायपुरियाची. २७ फेब्रुवारीला अभ्यास करत असताना अचानक त्याच्या पायाची नस फाटली गेली. अातल्या आतच वाहणारे रक्त थांबवण्यासाठी इंजेक्शन घेऊन तो सकाळी वडिलांच्या मदतीने दहावी बोर्ड परीक्षा देण्यास पोहोचला. मिलिंदने या वेदनांच्या परिस्थितीतही रात्रभर अभ्यास केला. आता हिमोफिलिया आजारामुळे त्याचे शरीर काचेप्रमाणे नाजूक झाले आहे. कुणी हात दाबून धरला तरी नसा तुटतात वा फाटतात. १५ वर्षांच्या मिलिंदच्या आतापर्यंत १०० हून अधिक वेळा नसा फाटल्या आहेत. असे झाल्याने त्यास भयंकर वेदना होतात. आठवडाभर अंथरुणावरच घालवावा लागतो.  

वडील ऋषभ रायपुरिया सांगतात की, मिलिंद १० दिवसांचा होता तेव्हा पहिल्यांदा पायाची नस फाटली होती. आम्ही सर्व घाबरून गेलो होतो. इंदूरच्या डॉ. आलोक मोदींकडून तपासणी केली तेव्हा हा एक आजार आहे हे कळले. एकदा लहानपणी दूध पिताना टाळूवर जखम झाली होती, तेव्हाही रक्त वाहणे बंद झाले नाही. दरवेळी या अपघातानंतर मिलिंदला महाग इंजेक्शन्स घ्यावी लागतात, तेव्हा कुठे रक्त थांबते. 
 
मिलिंद म्हणतो की, हा आजार असा आहे की, मी घराबाहेर एकटा जाऊ शकत नाही. या आजारावर कायमचा उपचार शोधण्यासाठी मला अभ्यास करून डॉक्टर बनायचे आहे. वडील ऋषभ सांगतात की, चार वर्षांपूर्वी मिलिंद जोधपूरला जात होता. पण रेल्वेत चढतानाच त्याची नस फाटली. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत उपचार करावे लागले. आता आम्ही कुठेही बाहेर गेलो तर त्यास उचलून वा ट्रॉलीवर बसवून घेऊन जातो. मिलिंद  रेलिंगविना पायऱ्या चढू शकत नाही. तो फिजिओथेरपी घेतो. पण तीही मर्यादित वेळेसाठी. कारण जास्त झाले तरीही नस तुटण्याचा धोका असतोच.   

आई नीलू जैन  यांनी सांगितले की, मिलिंद ५ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्याची स्मृती गेली होती. एका सप्ताहानंतर ती परतली. चार वर्षांपूर्वी शाळेतच पाय घसरल्याने मिलिंदचे हाड तुटले. इंदूरच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली, पण हाड जुळले नाही. तो ४० दिवसांपर्यंत अंथरुणावर पडून होता. वडिलांना म्हणाला, आपण त्रस्त होऊ नका, मी त्रास सहन करीन. नंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करून रॉड टाकला गेला.  

या आजारात ३ ते १२ हजार रुपये किमतीचे इंजेक्शन घेतल्यानंतर रक्त थांबते. सरकारी रुग्णालयातही ही इंजेक्शन्स असतात, परंतु गरजेपेक्षा खूपच कमी उपलब्ध असतात. इंदूरच्या रक्त तसेच कर्करोगतज्ज्ञ डॉ. मनीष नेमा यांच्यानुसार हिमोफिलिया आनुवंशिक आजार आहे. मात्र त्यावर कायमस्वरूपी उपचार नाही. तज्ज्ञ म्हणतात की, कधी-कधी जन्मापूर्वीच गुणसूत्रात बदल आल्यास असे होते.या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत म्युटेशन म्हणतात. गर्भवती महिला कर्करोगाचा बळी होऊ शकेल वा तिने काही अशा औषधींचे सेवन केलेले असेल, तर त्यात जन्मणाऱ्या नवजात बाळालाही हिमोफिलिया होण्याची शक्यता असते. 
बातम्या आणखी आहेत...